मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेससह इंडियाआघाडीचे दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना तयांच्या निवासस्थानी चाय पे चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. ही बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती आंदोलनाची माहिती दिली. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची चहापानासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले.
आपल्या देशाच्या संविधानाची हत्या झाली असून आज संविधान धोक्यात आहे. त्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे. आम्ही आंदोलन करत राहू, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे. पण एक व्यक्ति आणि एक सरकार त्याला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोदी सरकारवर केली.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे म्हटले. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हेच आमचे मिशन असल्याचे त्यांनी सांगितले. मतचोरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा हिशेब घेतला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
लोकशाहीची हत्या करण्यात आली असून, आता लोकशाही वाचवणे हेच आमचे ध्येय असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना सोडणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत दिल्लीसह देशात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.