Rahul Gandhi Latest News SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News : राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक परदेशात जाणार, काय आहे कारण?

Rahul Gandhi News : जयराम रमेश यांनी म्हटलं की,राहुल गांधी २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेतून ब्रेक घेणार आहेत. दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

प्रविण वाकचौरे

Rahul Gandhi News :

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्र सध्या उत्तर प्रदेशात आहे. मात्र राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक परदेशात जाणार आहेत. राहुल गांधी 26 फेब्रुवारीला आपल्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यानंतर पाच दिवसांनी ते पुन्हा राहुल गांधी ५ दिवसांनी पुन्हा एकदा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं की,राहुल गांधी २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेतून ब्रेक घेणार आहेत. दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राहुल गांधी यांची उपस्थिती गरजेची आहे. याशिवाय राहुल गांधी २७-२८ फेब्रुवाराला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथे जाणार आहेत. तिथे त्यांचा व्याख्यान आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर राहुल गांधी २ मार्चपासून पुन्हा भारत जोडा यात्रा सुरु करणार आहेत. त्यानंतर ५ फेब्रुवारीपर्यंत राहुल गांधी उज्जैन येथे जातील. तेथे ते महाकालेश्वर मंदिरात महाकालचे देखील दर्शना घेणार आहे, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.

भारत जोडो यात्रेचा आज ३९ वा दिवस आहे. ही यात्रा आता उन्नाव येथे पोहोचली आहे. यात्रा कानपूरला पोहोचल्यानंतर 22 आणि 23 फेब्रुवारीला ब्रेक घेणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला हा प्रवास पुन्हा सुरू होईल. ही यात्रा मुरादाबाद येथून सुरू होईल आणि संभल, अलिगढ, हाथरस आणि आग्रा जिल्ह्यांमधून राजस्थानमध्ये प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील कॅम्प भागात कारच्या दरवाजाला धडकून विचित्र अपघात

Political News : 'गुंगी गुडीया'चा वाद राष्ट्रवादी रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा

Shakib Al Hasan: माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; दगडफेकीनंतर आग लावण्याचाही प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Noodles Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी नूडल्स, वाचा सोपी रेसिपी

Lanja Fort : इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण, 'लांजा'जवळ लपलाय 'हा' भव्य किल्ला, एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT