Maratha Reservation : 'मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ अपूर्णच ठेवली', मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ अपूर्णच ठेवली, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचा विश्वासघात होईल असं वागू नये.
cm eknath shinde  manoj jarange patil on maratha reservation
cm eknath shinde manoj jarange patil on maratha reservationSaam TV
Published On

Manoj Jarange :

राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शिक्षणात १० टक्के आणि नोकरी १० टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली आणि पूर्ण देखील केली, असं म्हटलं.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायंची शपथ अपूर्ण ठेवली, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

cm eknath shinde  manoj jarange patil on maratha reservation
Sharad Pawar PC : इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सध्या काय सुरुये?, शरद पवारांनी उलगडून सांगितलं

आम्ही जे मागितलं नाही, ते आम्हाला देत आहेत, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. विशेष अधिवेशनाचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ अपूर्णच ठेवली. मराठा समाजाचा विश्वासघात होईल असं वागू नये. शेवटी समाजच मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मान्य करावं की, त्यांनी शिवरायांची घेतलेली शपथ अपूर्ण आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

आम्ही वाशीमध्ये सांगितलं होतं की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. तुम्हाला कुणी मराठा आरक्षणासाठी काम करु देत नसेल तर त्याचं नाव सांगावं आणि तुम्ही बाजूला व्हा. मग मराठा समाज बघून घेईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

cm eknath shinde  manoj jarange patil on maratha reservation
Ameen Sayani : रेडिओवरील 'गीतमाला'तील 'सूरमणी' हरपला! आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचं मुंबईत निधन

आजपासून आंदोलन सुरु करणार

सरकारच्या कालच्या अधिवेशनानंतर आमची निराशा झाली. आता आजपासून आंदोलनचा प्रयोग सुरु झाला समजा. आज सर्वांशी चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवू. संपूर्ण देशात आंदोलन पेटवणार. लाल किल्ल्यापर्यंत जाणार, असा इशाला जरांगेनी दिला आहे.

मराठ्यांना फक्त न्याय हवा आहे. थोड्याच वेळाच बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू. खेड्यापाड्यातले लोक आहेत, यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे बैठकीला थोडा वेळ लागेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com