Sharad Pawar PC : इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सध्या काय सुरुये?, शरद पवारांनी उलगडून सांगितलं

Sharad Pawar News Update : इंडिया आघाडीत जिथे सध्या मतभेद आहेत, जसं की उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशाठिकाणी वरिष्ठ नेत्यांना एकत्र चर्चा करावी, अशी रणनीती ठरली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Sharad Pawar News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी तयार केलेली इंडिआ आघाडी सध्या विखुरलेली आहे. अनेक पक्षांना इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, इंडिया आघाडीची बैठक अलीकडे झालेली नाही.

सर्व पक्षांनी एकत्रित काम करावे, पण काही पक्ष राज्यापुरते मर्यादित आहेत, त्या राज्यात घटक पक्ष बसून निर्णय घेतील. परंतु काही पक्षांची राज्यापुरतंच एकत्रित यावं, अशी चर्चा सुरु आहे. काही ठिकाणी वादविवाद सुरु आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काही आव्हाने आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Shrikant Shinde Speech: पुढच्या काळात मिमिक्रीच करावी लागेल, श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशमध्ये एकवाक्यात नाही. पश्चिम बंगालमध्ये जे प्रश्न आहेत ते अद्याप आम्ही हाताळले नाहीत. अशा ठिकाणी वरिष्ठ नेते बसावेत असा निर्णय झाला आहे. काँग्रेसकडून खरगे चर्चा करत आहेत. अशी रणनीती ठरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वंचितसोबतही चर्चा सुरु आहे

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं. वंचित आघाडीसोबत देखील चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी एकत्र बसण्याची सूचना केली आहे. लोकांसमोर आपला सामूदायिक कार्यक्रम काय आहे, याची स्पष्टता असावी आणि त्याबद्दल सध्या चर्चा सुरु आहे, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar
NCP Political Crisis : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाची हायकोर्टात याचिका, कारण काय?

सरकार दर १५ दिवसांनी निर्णय बदलत आहे

प्रत्येक गोष्टीत सरकारचे निर्णय चुकीचे ठरत आहेत. निर्यात बंदी घालण्याची गरज नव्हती. कांद्याचे भाव वाढल्यावर सभागृहात भाजपने दंगा घातला. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले म्हणून दंगा करायची गरज नव्हती. कांद्याच्या माळा गळ्यात घाला नाहीतर कवड्याच्या मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. निर्यातीचे शेतकऱ्यांनी करार केले आहेत. सरकारचा धरसोडपणा सुरू आहे. सरकार दर १५ दिवसाला निर्णय बदलत आहे, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com