NCP Political Crisis : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाची हायकोर्टात याचिका, कारण काय?

Maharashtra Politics : शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाने धाव घेतली आहे. अजित पवार गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawar saam tv
Published On

सचिन गाड, मुंबई

NCP Political Crisis Latest News :

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दोन्ही गटाच्या आमदारांना दिला होता. राहुल नार्वेकरांनी निकाल देत सर्व आमदरांना पात्र ठरवले होते. यावेळी शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाने धाव घेतली आहे. अजित पवार गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. (Latest marathi News)

अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा देऊनही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयास अजित पवार गटाच उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १५ फेब्रुवारीला दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार गटाने याचिका दाखल केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Ajit Pawar
Maratha Reservation: विधेयक मंजूर होताच गुणवर्ते सदावर्तेंनी थोपटले दंड; उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका देखील केली आहे. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे उद्या या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रणनीतीचा अवलंब अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाला देऊन सु्द्धा ठाकरे गटाचे आमदार अपात्र न केल्या विरोधात शिंदे गटाचे प्रतोद भारत गोगावले उच्च न्यायालयात गेले आहेत.

Sharad Pawar Ajit Pawar
Manoj Jarange Patil : उद्याचं सगळं ठरणार..आता अवधी नाही; सगेसोयरेच्या मागणीवर मनोज जरांगें ठाम, सरकारला दिला इशारा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्याकडून काय सुनावणी होते, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com