Maratha Reservation: विधेयक मंजूर होताच गुणवर्ते सदावर्तेंनी थोपटले दंड; उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाला आणि ओबीसी कुणबी करण्याला आपला विरोध असल्याचं सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरकारने जी भानगड केलीय हे टीकणार नाही. सरकारने पारदर्शकपणे मराठा आरक्षणाचे बिल मांडले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSaam Tv

Gunaratna Sadavarte On Marath Reservation :

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १०-१० आरक्षण दिले आहे. परंतु आरक्षण विधेयकाला वकील गुणवर्ते सदावर्ते यांनी विरोध केलाय. मराठा आरक्षणाचे बिल मंजूर केल्यास त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा दिलाय. (Latest News)

मराठा आरक्षणाला आणि ओबीसी कुणबी करण्याला आपला विरोध असल्याचं सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरकारने जी भानगड केलीय हे टीकणार नाही. सरकारने पारदर्शकपणे मराठा आरक्षणाचे बिल मांडले नाही. तसेच सरकारने हे बिल नामंजूर केलं नाही तर सरकारने लक्षात ठेवावं आम्ही सीरियातील माणसं नाही तर हिंदुस्तानातील माणसं आहोत. प्रभू रामचंद्रला मानणारे माणसं आहोत. एकाही गुणवत्तावर अन्याय सहन करणार नसल्याचं सदावर्ते म्हणालेत. सरकारने बिल पास करण्याचं धाडस केलं तर त्याला उच्च न्यायालयात चॅलेज करू असा इशारा गुणवर्ते सदावर्ते यांनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com