Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

Rahul Gandhi latest news today : राहुल गांधी यांनी १२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्ष आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi Supreme Court march October 12 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भारताचे संविधान घेऊन देशवासीयांना आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तरुण रस्त्यावर उतरून शांततेत आवाज उठवत असताना भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

या कारवाईचा निषेध करत राहुल गांधी यांनी उद्या सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा किंवा जाती-धर्माचा नसून सर्व भारतीयांचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा धडकणार असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांच्या मुख्य ३ मागण्या:

व्होट चोरी

मतदान प्रक्रियेतून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) हटवणे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करणे.

या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आणि नागरिक एकत्र येऊन मुख्य न्यायमूर्तींची (CJI) भेट घेणार आहेत. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने या मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधींनी व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटले?

तुम्ही काल पाहिलं असेल, तरुणांना बाहेर यायचं होतं. कोणतीही द्वेषभावना न ठेवता प्रेमाने पुढे यायचं होतं, पण त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपच्या गुंडांनी आणि पोलिसांनी त्यांना मारलं. असा भारत आपल्याला नको आहे. उद्या आपण सुप्रीम कोर्टावर मार्च (मोर्चा) काढणार आहोत. राजकीय पक्ष म्हणून नाही, वैयक्तिक म्हणून नाही किंवा जात-धर्म, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता एक भारतीय म्हणून आपण सर्वजण मार्च करणार आहोत. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या आणि लोकशाही वाचवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आपल्यासोबत यावे, मग तुमचा संबंध कोणत्याही पक्षाशी असो, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांनी एकत्र यावं - राहुल गांधी

जोपर्यंत तुम्ही भारताच्या संविधानाशी जोडलेले आहात आणि संविधानाचे रक्षण करू इच्छिता, तोपर्यंत एकत्र या. घाबरण्याचे अजिबात कारण नाही. सर्व विरोधी पक्षांनी आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टाकडे वाटचाल करावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही सरन्यायाधीशांना (Chief Justice) भेटून देशाच्या वतीने निवेदन देणार आहोत. व्होट चोरी रोखणे, ईव्हीएम (EVM) हटवणे आणि ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करणे या मागण्यांसाठी हे निवेदन असेल. नरेंद्र मोदी, अमित शाह, डोव्हाळ किंवा मोहन भागवत देशाचा आवाज दाबू शकत नाहीत. उद्या संपूर्ण भारत सुप्रीम कोर्टाकडे कूच करेल., असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: आंदोलकांच्या सुटकेसाठी ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये

Navratri Temples : आदिशक्तीचा महिमा अनुभवायचा आहे? नवरात्रीत आवर्जून दर्शन घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे

SCROLL FOR NEXT