आम्ही काय आतंकवादी होतो का? महाराष्ट्रात पाऊल ठेवताच अभिजित दिपके संतापले; मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Abhijit Dipke latest news : नागपूर विमानतळावर दाखल होताच अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ‘आम्ही काय आतंकवादी होतो का?’ असा सवाल उपस्थित केला. दिल्लीतील कारवाईवरून त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.
Abhijit Dipke
Abhijit Dipke saam tv
Published On: 

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात पाऊल ठेवताच दिपकेंनी दिल्ली पोलिसांचा समाचार घेतला. आपल्याला विमानामध्ये थेट आंतकवाद्याप्रमाणे अटक करण्यात आली, असा संताप त्यांनी व्यक्त केला. ते नागपूर विमानतळावर बोलत होते. दिल्लीतून ते आज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

भावाला बोलू दिले नाही:

आपल्याला दिल्ली पोलिसांनी कुटुंबीयांशी किंवा वकिलांशी बोलू दिले नाही. एवढेच नव्हे तर, पहाटे साडेतीन वाजता आई-वडिलांना फोन करून तुम्हाला अटक झाली आहे असे सांगा, अशी भीती दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा गंभीर आरोप दिपकेंनी केला.

Abhijit Dipke
Bharat Bandh : २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक; महाराष्ट्रातही पडणार पडसाद, बड्या नेत्याची घोषणा

गेल्या ७०-८० वर्षांच्या इतिहासात कधीही प्लेनमधून थेट कोणाला अशा प्रकारे उचलून अटक करण्यात आली नाही. "आम्ही काय आतंकवादी होतो का?" असा सवाल दिपकेंनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकारामुळे आपण अजिबात घाबरणार नाही आणि शांत बसणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत देश गुलाम बनू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Abhijit Dipke
Morning Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? घाबरू नका! डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' १ सोपा नियम फॉलो करा

तानाशाही संपवावी लागेल:

देशात सध्या तानाशाही सुरू असल्याचा आरोप करत, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरूनच हे सगळे सुरू आहे, असा घणाघात दिपकेंनी केला. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी अख्खी दिल्ली बंद करून रस्ते आणि मेट्रो रोखण्यात आल्याचे ते म्हणाले.

लहान मुलींना मारहाण केली जात असून पोलिसांना कुणाचे खून करण्याचे आदेश मिळाले आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी दिल्ली पोलिसांना विचारला. तसेच, ज्यांनी हा सर्व प्रकार केला, त्याच डीसीपीचे प्रमोशन करण्यात आले, असा आरोप करत "देश जेव्हा गुंडे चालवतात, तेव्हा गुंडांचेच प्रमोशन होते," असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com