Rahul Bhatt -  Security forces took revenge of kashmiri pandit within 24 hours
Rahul Bhatt - Security forces took revenge of kashmiri pandit within 24 hours  Saam Tv
देश विदेश

अखेर महसूल अधिकारी राहुल भट्ट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : महसूल विभागात अधिकारी असलेले काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या बडगाममध्ये गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या विरोधात काश्मिरी पंडित समाजाने ठिकठिकाणी आंदोलन केले. भट्ट यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी मीनाक्षी यांना सुरक्षादलाकडून दोन दिवसांनी त्या दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलानं २४ तासांच्या आत त्याचं वचन पूर्ण केलं आहे. सुरक्षा दलानं बांदीपोरा येथे शुक्रवारी संध्याकाळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यातील दोघांनी राहुल यांच्या हत्येत महत्वाची भूमिका निभावली होती. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी आहेत. (Kashmiri Pandit Rahul Bhatt Latest News Update in Marathi )

हे देखील पाहा -

काश्मीरमध्ये (Kashmir) दोन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले होते. त्यावेळी बांदीपोरा येथे सुरक्षा दलानं त्यांच्यावर हल्ला केला. ११ मे रोजी झालेल्या हल्ल्यात दोन्ही दहशतवादी सानिंदर वन क्षेत्रात लपले होते. मात्र, त्यांचा शोधून सुरक्षा दलानं त्यांचा खात्मा केला.

उपराज्यपालांनी केलं आश्वासन पूर्ण

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काही तासांपूर्वी ट्विट केलं होतं की, राहुल भट्टच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं. 'दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना या अपराधाबद्दल मोठी किंमत चुकवावी लागेल, असं ट्विट उपराज्यपालांनी केलं होतं.

राहुल यांच्या कार्यालयातील काही लोकांवर संशय

राहुल भट्ट यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मीनाक्षी म्हणाल्या,'मृत्यूच्या दहा मिनिट आधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी घरी वाढदिवसाला जाण्यासाठी लवकर येण्यास सांगितलं होतं. त्यांनी येण्याचंही कबूल केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्या हत्येची वार्ता मिळाली', असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पत्नीनं पतीच्या कार्यालयातील सहकाऱ्यांवर त्यांच्या हत्येच्या नियोजनात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

३० एप्रिलला दिसले होते ते दहशतवादी

बांदीपोरा येथे १० मेच्या आधी ३० एप्रिल रोजी या तीन दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रॅक झालं होतं. यातील दोन दहशतवादी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. दोघेही उर्दू भाषा बोलणारे होते. त्यांच्यासोबत एक स्थानिक दहशतवादी होता.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT