लाहोर : पाकिस्तानमधून (Pakistan) एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. इथे एका खासदाराचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. आमीर लियाकत (MP Amir liaquat) असं या खासदाराचं नाव असून आमीर हे पीटीआय पक्षाचे खासदार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लियाकत हे बेडरूमवर आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत आहेत. इतकंच नाही तर, तर व्हिडिओमध्ये ते ड्रग्जही घेताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आमिर लियाकत यांचा हा व्हिडिओ त्यांची तिसरी पत्नी दानिया शाहने व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे. (Pakistani MP Amir liaquat Leaked Video)
दानिया शाह ही आमीर लियाकत यांची तिसरी पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच दानियाने लियाकत यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दानियाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. दानियाने आमिर लियाकत यांच्यावर प्राणघातक हल्ला, तुरुंगात टाकणे आणि जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ शूट करण्यापर्यंतचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच आमिर यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी तिसरी पत्नी दानिया हिच्यावर गंभीर आरोप केले आहे.
ते म्हणाले की, ' माझा हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यांची भूमिका काय आहे हे मला माहित आहे. पण एका व्यक्तीला अशा प्रकारे बदनाम केले जाते हे पोलिसांना का लक्षात आले नाही. न्यायव्यवस्था कुठे आहे, प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचे रक्षण करणे ज्याची जबाबदारी आहे, त्या न्यायव्यवस्थेने कोणतेही पाऊल का उचलले नाही? फेडरल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीच्या सायबर क्राईम शाखेने अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही'? असे प्रश्न आमीर यांनी उपस्थित केले आहे.
दरम्यान, आमिर लियाकत यांच्या व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपावर दानियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, "मी कोणताही व्हिडिओ बनवला नाही. हा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला आहे. मी त्याच्यावर कोणतीही चिखलफेक केलेली नाही, त्याने मला कायदेशीररित्या घटस्फोट द्यावा अशी माझी इच्छा आहे". दानियाने आमिर लियाकतवर ड्रग्जसोबतच दारू अश्लिल व्हिडिओ बनवल्याचा आरोपही केला आहे. हे व्हिडिओ आमीर परदेशात पाठवत असल्याचं दानियाने म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.