Maharashtra Political News  Saam tv
देश विदेश

Radhakrishna Vikhe Patil meet Amit Shah : विखे पिता-पुत्रांनी घेतली अमित शहांची भेट; दूधाच्या आंदोलनावरील बैठकीत काय चर्चा झाली?

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर विखे पिता-पुत्रांनी घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत राज्यातील दूधाच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारने दूधाच्या भुकटीला आयात करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाच्या विरोधात दूध उत्पादक शेतकरी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. तसेच त्यांची दूधाला प्रतिलीटर ४० रुपये दर देण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

विखे पिता-पुत्र आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात दूधासाठी एमएसपीच्या कायद्यावर चर्चा झाली. तसेच इतर राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

भेटीत काय चर्चा झाली?

राज्यात गाजलेल्या महत्वाच्या लोकसभेच्या लढतीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातही महायुतीला पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवाच्या कारणावरूनही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात १२ पैकी १२ विधानसभेच्या जागा जिंकण्याचा दावा विखेंनी केला होता. मात्र, भाजपच्या ३ जागा निवडून आल्या होत्या. या पराभवाला भाजपच्या नेत्यांनी विखे पाटील यांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर विखे विरुद्ध स्थानिक भाजप नेते असा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता. आता झालेल्या बैठकीत पक्षाला यश कसं मिळवता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेचा फायदा विधानसभा निवडणुकीत कसा होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कांद्याचा प्रश्न पेटला होता. त्यावेळी विखे पिता-पुत्रांनी अचानक अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली होती. निर्यातबंदी न उठवल्याचा तोटा लोकसभेच्या जागांवर बसल्याचा दिसून आलं होतं. त्यानंतर आता दूध आंदोनलानंतर विखे पिता-पुत्रांनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीनंतर दूध आंदोलन शांत होतं का हे पाहणं महत्वाच असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohan Bhagwat: 'भारत एक हिंदू राष्ट्र, सुरक्षेसाठी आपल्याला एकजुट व्हावे लागेल': सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

TMKOCमध्ये नव्या सोनूची एन्ट्री, आहे तरी कोण?

Bigg Boss Grand Finale : 'आज की रात...' जान्हवी-निक्कीच्या दिलखेचक अदा, ग्रँड फिनालेला धुरळा उडणार

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

SCROLL FOR NEXT