Singer Rajveer Jawanda Seriously Injured Saam
देश विदेश

आधी दुचाकीवरून जाताना अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्र्यांची पोस्ट व्हायरल

Singer Rajveer Jawanda Seriously Injured: राजवीर जावंदा हिमाचल प्रदेशातील अपघातात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती. अपघातानंतर ह्रदयविकाराचा झटकाही आला.

Bhagyashree Kamble

  • राजवीर जवंदाच्या बाईकचा अपघात.

  • फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

  • पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस.

शनिवारी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पंजाबी गायक राजवीर जवंदा गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर मोटारसायकलवरून शिमलाला जात होते. बद्दी परिसरात त्यांचा मोटारसायकलवरून नियंत्रण सुटले. त्यांच्या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटकाही आल्याची माहिती आहे.

अपघातानंतर गायक राजवीर यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. सध्या ते व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत, असे फोर्टिस हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटलं आहे. आज सकाळी जवंदा यांच्या दुचाकीचा गंभीर अपघात झाला. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी त्यांना ह्रदयविकाराचाही झटका आला होता.

फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैंस, पंजाब कांग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह राजा वारिंग यांच्यासह अनेक राजकारण्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'मला माहिती मिळाली की, प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचा हिमाचल प्रदेशात अपघात झाला. ते दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे. ते अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी त्यांच्या लवकर प्रकृती सुधारासाठी प्रार्थना करतो', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI New President: BCCI ला मिळाला नवा बॉस! 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली अध्यक्षपदाची धुरा

Crime News: झोपेत असताना चाकूने सपासप वार, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं; सांगली हादरले

Maharashtra Live News Update : साईबाबा संस्थानकडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी रूपयांची मदत जाहीर

Cholesterol Symptoms: त्वचेवर ही ५ लक्षणे दिसल्यास व्हा सावध! असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

Actress Son Death: धक्कादायक! अभिनेत्रीच्या मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्यू; मनोरंजनविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT