क्षणात होत्याचं नव्हतं झालं, ३९ जणांचा मृत्यू; चेंगराचेंगरीच्या घटेननंतर थलापती विजयची पहिली पोस्ट, अभिनेता काय म्हणाला?

Vijay Thalapathy Breaks Silence on Karur Stampede: टीव्हिके नेते विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी. ३९ जणांचा मृत्यू पण अजून आकडा वाढण्याची शक्यता.
Stampede at TVK Leader Vijay Thalapathy
Stampede at TVK Leader Vijay ThalapathySaam
Published On
Summary
  • विजय थलापतींच्या रॅलीत चेंगराचेंगरी.

  • ३९ जणांचा मृत्यू.

  • ७० हून लोक जखमी.

तामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात नुकतेच सक्रीय झालेले टीव्हिकेचे नेते विजय थलापती यांच्या करूर येथील रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ३९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विजय थलापती यांनी या घटनेवर एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले दु:ख व्यक्त केलं आहे.

या दुर्घटनेवर विजय थलापती यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, 'खूप दु:ख झाले आहे. मी ज्या वेदना आणि दु:खाचा अनुभव घेत आहे ते समजण्यापलिकडे आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्या आमच्या प्रिय बंधू आणि बहिणींच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो'.

Stampede at TVK Leader Vijay Thalapathy
डोंबिवलीत तरूणानं ११ व्या मजल्यावरून मारली उडी; आधी लोंबकळत होता नंतर.. आत्महत्या की घातपात?

मिळालेल्या माहितीनुसार, करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. टीव्हिके यांच्या सभेसाठी लाखो लोक उपस्थितीत झाले होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेची चौकशी सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत मुलेही जखमी झाली आहेत.

Stampede at TVK Leader Vijay Thalapathy
Hingoli: राज्यात पावसाचं रौद्ररूप! पण दुसरीकडे शिंदेंच्या राम कदमांच्या नवरात्रौत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम

टीव्हिके नेता विजय थलापती भाषण देत असताना लोकांची गर्दी वाढू लागली. हळूहळू अनियंत्रित होत गेली. वाढत्या गर्दीमुळे अनेक मुले आणि इतर जण बेशुद्ध झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com