
हिंगोलीत पावसाचं थैमान.
शिंदे गटाकडून गौतमी पाटील यांचा डान्स शो आयोजित.
ठाकरे गटाकडून टीकेची तोफ.
राज्यभरात पावसानं अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रावर महाभयंकर संकट ओढवलं आहे. कुणाच्या शेताची नासधूस झाली आहे. तर कुणाच्या घराच्या फक्त भिंती उरल्या आहे. पुराच्या पाण्यात पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. पाऊस बरसत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातूनही आसवे थांबत नाहीयेत. अशातच हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेकडून गौतमी पाटील यांच्या डान्सचे आयोजन केलं होते.
राम कदमांची कुलस्वामिनी नवदुर्गा उत्सव समितीने गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काल रात्रीच्या सुमारास लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिंगोलीमध्ये दाखल झाली होती. हिंगोलीत प्रचंड गर्दी जमली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना चक्क लाठीचार करावा लागला.
भर पावसात गौतमी यांचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमानंतर परिसरातून टीका होताना पाहायला मिळत आहे. हिंगोलीत संततधार कोसळत आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे हिंगोलीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.
यावेळी भुसे दौऱ्यावर येणार म्हणून पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. तर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव त्यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र, शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी गौतमी पाटील यांचा भरपावसात कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.