Punjab University Vendalism Student Protest News  Saam tv
देश विदेश

Punjab : व्हायरल मेसेजनंतर विद्यार्थी आक्रमक, युनिव्हर्सिटीत गदारोळ; जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग रोखला, नेमकं प्रकरण काय?

Punjab Univercity Rape Case News : पंजाबमधील LPU फगवाडा येथे विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. पोलिसांकडून व्हायरल मेसेजची सत्यता आणि घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पंजाबमधील फगवाडा येथील LPUमध्ये कथित बलात्काराचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

  • व्हायरल मेसेजमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप

  • आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराची तोडफोड

  • राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ

सोशल मीडियाचं जाळं सर्वदूर पोहचलं आहे. या सोशल मीडियाचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे वाईट परिणाम देखील पाहायला मिळतात. एक व्हायरल आणि चुकीचा मेसेज समाजात कशा प्रकारची तेढ निर्माण करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजेच पंजाबमध्ये सध्या सुरु असलेलं प्रकरण. पंजाबमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये एका मुलीवर अत्याचार झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

पंजाबमधील फगवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये एका विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कथित घटनेच्या निषेधार्थ रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठ परिसरात जमा झाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शांततेत निषेध करत आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, काही वेळातच परिस्थिती चिघळली. गर्ल्स हॉस्टेल परिसरातून आंदोलनाला सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला.

यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरही मोठी गर्दी झाली. यावेळी मुख्य गेटची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थी चंदीगड-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. त्यांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे रात्रीच्या वेळी या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

घटनेची माहिती मिळताच कपूरथळाचे एसपी गौरव तूर हे रात्री घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये विद्यापीठाबाहेरील एका व्यक्तीने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कथित बलात्काराच्या घटनेला पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे व्हायरल मेसेजची सत्यता काय आहे, तो नेमका कुठून प्रसारित झाला आणि त्यामागील तथ्य काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच विद्यार्थिनीबाबत प्रत्यक्षात कोणती घटना घडली होती का, की सोशल मीडियावरील मेसेजमुळे हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला, हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT