Punjab Kiratpur Train Accident
Punjab Kiratpur Train Accident Saam TV
देश विदेश

भयंकर! धावत्या ट्रेनखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

साम टिव्ही ब्युरो

Punjab Kiratpur Train Accident : पंजाबमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. किरतपूर साहिबजवळ भरधाव रेल्वेखाली येऊन तीन मुलांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारसच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. लोकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या दुर्देवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, किरतपूर साहिबजवळ चार मुले रेल्वेरुळाजवळ खेळत होती. खेळताना ही मुले इतकी रमली की त्यांना भरधाव वेगात येणारी ट्रेन दिसलीच नाही. काही कळण्याच्या आत ट्रेनने चारही मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगा रुळाबाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.

किरतपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Police) जगजीत सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, मुले रेल्वेरुळाजवळ असलेल्या झाडांवरची बेरी खायला आली होती. दरम्यान, यातील एक मुलगा रुळावर आला. त्यापाठोपाठ तीन मुलेही रुळावर आली. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका बालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. गार्डने गंभीर जखमी मुलांना किरतपूर साहिब रेल्वे स्टेशनवर नेले. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटल श्री आनंदपूर साहिब येथे पाठवण्यात आले. यादरम्यान रुग्णवाहिकेतच एका बालकाचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

SCROLL FOR NEXT