Punjab Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

Punjab Crime: पंजाबमध्ये आणखी एका कबड्डीपटूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. भररस्त्यात हा हत्येचा थरार रंगला. कबड्डीपटूच्या हत्येची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. पंजाबमध्ये वर्षभरात ९ कबड्डीपटूंची हत्या करण्यात आली.

Priya More

Summary -

  • लुधियानातील समराला ब्लॉकमध्ये कबड्डीपटूची हत्या

  • गुरविंदर सिंगची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

  • लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत घेतली हत्येची जबाबदारी

  • आठवडाभरात कबड्डीपटूच्या हत्येची ही दुसरी घटना आहे

पंजाबच्या लुधियानामध्ये आणखी एका कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली. भररस्त्यात गोळ्या झाडून कबड्डीपटूला संपवण्यात आले. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये ही घटना घडली. कबड्डीपटू गुरविंदर सिंह याची हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.

सोशल मीडियावर अनमोल बिश्नोई गँगच्या नावाने एक पोस्टर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये कबड्डीपटूच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई यांनी घेतली आहे. या कबड्डीपटूची हत्या करण माडपूर आणि तेज चक यांनी केली. याआधी ३१ ऑक्टोबरला लुधियानामध्ये कबड्डीपटू तेजपालची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी अद्याप कुणी घेतलेली नाही.

अनमोल बिश्नोईच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याच्या शत्रूंना पाठिंबा देणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई आज कबड्डीपटूच्या हत्येची जबाबदारी घेतात. ही हत्या आमचे भाऊ करण माडपूर आणि तेज चक यांनी केली आहे. बाबू समरला आणि त्यांचे सहकारी जे कोणी आमच्या शत्रूंना पाठिंबा देत आहेत, त्यांनी काळजीपूर्वक ऐका तुमच्यापैकी जो कुणी सापडेल त्याच्यासोबत आम्ही असेच करू. हा इशारा आमच्या शत्रूंना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. एकतर तुमचे मार्ग सुधारा किंवा तयार राहा पुढची गोळी तुझ्यावर असेल...!'

दरम्यान, शनिवारी पंजाबमधील लुधियाना येथे कबड्डी खेळाडू तेजपाल सिंगची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पंजाबमध्ये ९ कबड्डी खेळाडूंची हत्या करण्यात आली आहे. कबड्डीमधील गुन्हेगारी कुठून आली? काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक शत्रुत्व समोर आले आहे. कबड्डी खेळाडूंच्या हत्येमागे एक मोठे नेटवर्क आहे. कबड्डी फक्त क्रीडा जगताशी जोडलेली नाही तर गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया आणि गुंड नेटवर्कशी जोडलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

Maharashtra Live News Update: 11 हजार दिव्यांनी लखलखला अंबड येथील मत्स्योदरी देवीचा परिसर,दीपोत्सवासाठी परदेशी पाहुण्याची हजेरी

J J Hospital Mumbai: डॉक्टर महिलेला अपमानास्पद वागणूक; राज्य महिला आयोगाची सर जे जे समूह रुग्णालयावर कारवाई

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं?

SCROLL FOR NEXT