Punjab Police News : कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या गँगस्टरचा एन्काऊंटर; पोलिसांची मोठी कारवाई

punjab police update : पोलिसांच्या गोळीबारानंतर गँगस्टर सुखविंदर राणा फरार झाला. त्यानंतर भंगालामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी गँगस्टरचा एन्काऊंटर केला.
Punjab police
Punjab police Saam Tv

Punjab Police News :

पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील मुकेरिया गावात पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या गँगस्टरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. सीआईए पथकाने अवैध शस्त्रसाठा असणाऱ्या ठिकाणी रविवारी छापा टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारानंतर गँगस्टर सुखविंदर राणा फरार झाला. त्यानंतर भंगालामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी गँगस्टरचा एन्काऊंटर केला. (Latest Marathi News)

चकमकीत हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

रविवारी गँगस्टर सुखविंदर राणाने केलेल्या गोळीबारात सीआइए स्टाफचे हेड कॉन्स्टेबल अमृतपाल सिंग यांचा मृत्यू झाला. अमृतपाल सिंग यांना दीड वर्षांच्या दोन मुली आहेत. अमृतपाल सिंग हे होशियापूर जिल्ह्यातील दसूहाजवळील जंडोर गावात राहत होते. त्याच गावात अमृतपाल सिंग यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

Punjab police
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

पोलिसांकडून २५ रुपयांचं बक्षीस

गँगस्टर सुखविंदर राणा हा पोलिसांवर गोळीबार करून फरार झाला होता. सुखविंदर राणाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर २५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. पोलीस त्याच्या शोधात होते. पोलिसांनी सोमवारी सुखविंदरला भंगालाजवळ घेरलं. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांकडून गँगस्टर सुखविंदर राणाचा एन्काऊंटर करण्यात आला.

Punjab police
Chhatrapati Sambhajinagar Crime: शेतीच्या वादातून दगडाने ठेचून केली सख्ख्या भावाची हत्या, भाऊ आणि पुतण्याला अटक

नेमकं काय घडलं?

मुकेरिया गावात मनसूरपूरमध्ये अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी गँगस्टर सुखविंदर राणाने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात एका वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

Punjab police
Crime News: फोन करून बाहेर बोलवलं अन् डोक्यात गोळी झाडली; छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाची हत्या

गँगस्टर सुखविंदरची पोलीस कॉन्स्टेबल अमृतपाल सिंह यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पोलीस कॉन्स्टेबल अमृतपाल सिंह यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अमृतपाल सिंह यांच्या मृत्यूनंतर मंसूरपूर गावाला पोलिसांच्या छावणीचं स्वरुप आलं होतं. गँगस्टर मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा उभा केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com