पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ पूर्वी मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता.
अमरिंदर सिंग यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार
पंजाबमध्ये २०२७ साली विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एका दिवसापूर्वीच दक्षिणेत भाजपला मोठा धक्का बसला होता. दक्षिणेतील अण्णामलाई यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपशी काडीमोडी करणार असल्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंग यांची घरवापसी होणार असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी दावा केला की, कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान कॅप्टन आणि हुडा हे चांगले मित्र आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, हुडा अमरिंदर सिंग हे काँग्रेस पक्षात परत जाऊ शकतात. अण्णामलाई यांनी अलीकडेच भाजप सोडला आहे. जर कॅप्टन यांनीही भाजपसोबतचे संबंध तोडले, तर पक्षाला आणखी एक धक्का बसू शकतो.
भाजपने भूपिंदर सिंग हुडा यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंजाब भाजपचे प्रवक्ते प्रीतपाल सिंग बलियावाल यांनी हुडा यांच्या दावा खोडून काढला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भूपिंदर सिंग हुडा यांच्या संपर्कात असल्याचा त्यांचा दावा खोटा आहे. रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्या म्हणण्यानुसार हुडा कोणाच्याही संपर्कात नाहीत. हुडा यांनी फक्त आपण संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यातून दुसरा कोणताही अर्थ काढू नये, असं भाजप प्रवक्ते भूपिंदर सिंग म्हणालेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकवेळा काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे. पंजाबमध्ये पक्षाची भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसमधील नेते आपले मत जाणून घेत. परंतु भाजपमध्ये असं काही होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे तीनवेळा काँग्रेस अध्यक्ष राहिलेत. त्यावेळी काँग्रेस पक्षातील नेते त्यांचा सल्ला नेहमीच घेत असायचे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून सरदार केवल सिंग ढिल्लन यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला आहे. या प्रकरणातही भाजपने त्यांचे मत विचारले नसल्याची चर्चा आहे.
काँग्रेसबाबत बोलातना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, काँग्रेस एक कुटुंबासारखे आहे. जेथे नेते भेटायला येत. परंतु भाजपमध्ये असं होत नाही. आपण जेव्हा काँग्रेसमधील पक्षातील नेत्यांना फोन करायचो तर नेते भेटायला येत असायचे. भाजपमध्ये ही सिस्टीम नाहीये, असं अमरिंद सिंग म्हणालेत. तसेच आपल्या वाढदिवशी राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच भाऊ रणधीर यांचे निधन झालं होतं तेव्हा राहुल गांधींनी सांत्वनपर संदेश पाठवला होता, परंतु भाजपमधील एकाही नेत्यानं भेट घेतली नाही, ना सांत्वन केलं , अशी खदखद कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बोलून दाखवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.