विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये आपला मोठा धक्का
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा
चेतन सिंह जौरामाजरा यांनी आप पक्षाचा राजीनामा दिला
हरमीत सिंह पठाण माजरा यांचा आम आदमी पार्टी सोडली
पंजाबमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. आपच्या दोन आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पटियालाच्या सानौर मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंग पठाण माजरा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला. तर पंजाबमधील समानाचे आमदार आणि माजी मंत्री चेतन सिंग जौरामाजरा यांनीही आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
आपचे आमदार चेतन सिंग सौरामाजरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी, चेतन सिंग जौरामाजरा, आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.' आपने शनिवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या दोन आमदारांनी राजीनामा दिला.
आपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये आमदार चेतन सिंग जौरामजरा आणि आमदार हरमीत पठाण माजरा यांची नाव नव्हती. पक्षाने निवडणुकीसाठी तिकीट न दिल्यामुळे हे या दोन्ही आमदारांनी नाराज होत राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. हरमीत पठाण माजरा हे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नातेवाईक आहेत.
आपच्या दोन आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे याची चर्चा होऊ लागली आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत चेतन सिंग जौरामजरा आणि हरमीत पठाण यांना तिकीट मिळणार नाही हे निश्चित होते. आम आदमी पार्टीने यापूर्वीच राजोंध सिंग हंडाया यांची सनौरचे प्रभारी आणि सुरजित सिंग रखरा यांची समानाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.