AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

Aam Aadmi Party MLA : एका मुलीला मारहाण करत तिच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आपचे आमदार आमदार मनजिंदर सिंह लालपुरा यांच्यासह ७ जणांना दोषी ठरवले आहे.
Aam Aadmi Party MLA
Aam Aadmi Party MLAx
Published On
Summary
  • आप आमदार मनजिंदर सिंह लालपुरा यांना विनयभंग प्रकरणात दोषी ठरवले आहे.

  • मुलीला मारहाण आणि विनयभंग प्रकरणी आमदारासह ७ जणांना दोषी ठरवण्यात आले.

  • या प्रकरणाचा निकाल १२ सप्टेंबरला सुनावला जाणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

Aam Aadmi Party : आम आदमी पक्षाचा पंजाबमधील आमदार अडचणीत आला आहे. मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात खादूर साहिबचे आमदार मनजिंदर सिंह लालपुरा यांच्यासह ७ आरोपींना तरनतारन जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आपच्या आमदारासह सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा निकाल दोन दिवसांनी लागणार आहे.

एका मुलीला मारहाण आणि विनयभंग प्रकरणी आमदारासह अन्य आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. १२ सप्टेंबर रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मुलीवर हल्ला केल्याचा गुन्हा असल्याचे आमदार मनजिंदर सिंह लालपुरा यांच्या वकिलांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा निकाल येणे अजून बाकी आहे. आम्ही जिल्हा न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ असेही लालपुरा यांच्या वकिलाने म्हटले आहे.

Aam Aadmi Party MLA
Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

२०१३ मध्ये मनजिंदर सिंह लालपुरा हे टॅक्सी चालक होते. तरनतारन जिल्ह्यातील उस्मा गावातील एका मुलीने लालपुरा यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. लग्न समारंभात विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप या मुलीने केला होता. घटनास्थळी तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनीही मला मारहाण केली असे मुलीने म्हटले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आणि मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.

Aam Aadmi Party MLA
Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

टॅक्सी ड्रायव्हर असलेले मनजिंदर सिंह लालपुरा २०२२ मध्ये खदूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. त्यांना आम आदमी पक्षाने संधी दिली होती. लालपुरा हे १६,४९१ मतांनी विजयी झाले होते. खदूर साहिब विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार सलग दोनदा जिंकून आले होते. पण २०२२ मध्ये काँग्रेसची जागा आम आदमी पक्षाने जिंकली.

Aam Aadmi Party MLA
Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com