Punjab Government Removes Covid Restrictions
Punjab Government Removes Covid Restrictions Saam Tv
देश विदेश

पंजाब सरकारचा निर्णय; राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: काही दिवसांपासून देशामध्ये कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसून येत आहे. कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्याने देशात नागरिकांना दिलासा मिळत आहे. पंजाबमध्ये (Punjab) देखील परिस्थिती नियंत्रणात आली असून गेल्या २४ तासात कोरोनामुळे (Corona) एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा-

पंजाब सरकारने (government) राज्यामधील कोरोनाचे सर्वच निर्बंध (Restrictions) तात्काळ हटविण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. बुधवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पाडणार नाही. पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री (CM) भगवंत मान हे उद्या शपथ घेणार आहे. या शपथविधीकरिता किमान ३ ते ४ लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. यानुसार सध्या पंजाबमध्ये मोठी तयारी करण्यात येत आहे.

शपथविधीसाठी ५० नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर नागरिकांसमोर LEDलावण्यात येणार आहे. शपथविधीसाठी ८ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाा आहे. सोमवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये फक्त २८५ अॅक्टिव्ह रुग्ण होते. तर गेल्या २४ तासात पंजाबमध्ये ४८ रुग्णांची नोंद झाली आहे. या पैकी १८ ऑक्सिजन सपोर्ट, ४ आयसीयू आणि एका रुग्णाला वेंटिवलेटरवर आहे. पंजाबमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.३७% इतका आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील खटकर कलान गावात होणाऱ्या भगवंत मान यांच्या शपथविधी समारंभामध्ये एकही व्हीआयपी पाहुणे नसणार आहेत. दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाने अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधी कार्यक्रमासाठी आमंत्रित केले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे सर्व बडे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Today's Marathi News Live: भाजपच्या मुलुंड कार्यालय तोडफोड प्रकरण, शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video

kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी चाल

SCROLL FOR NEXT