Beed: हमालाचा मुलगा बनला PSI; खाकीचे स्वप्न उतरले सत्यात...(पहा Video)

कृषी दुकानामध्ये काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली
Beed: हमालाचा मुलगा बनला PSI; खाकीचे स्वप्न उतरले सत्यात...(पहा Video)
Beed: हमालाचा मुलगा बनला PSI; खाकीचे स्वप्न उतरले सत्यात...(पहा Video)विनोद जिरे
Published On

बीड: शेतकऱ्यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई- वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून कोणतरी मोठे व्हायचे स्वप्न या घरामधील तरुणाने बघितले होते. आई- वडिलाबरोबर कामात तर मदत केली. पण स्वतः कृषी दुकानामध्ये काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि बीड मधील एका छोट्या गावचा तरूण पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. (beed The Hamal son became PSI)

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकट देखील भेदून यशाला गवसणी घालणे शक्य असते. हेच राज्यातल्या अनेक शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांनी नुकत्याच झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेमधून दाखवून दिले आहे. खाकी वर्दी अंगावर असावी असे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने मिळेल ते काम करून अभ्यास केला आहे. आणि बीड (beed) जवळच्या शिदोड मधला ज्ञानेश्वर देवकते हा तरुण पीएसआय झाला आहे.

पहा व्हिडिओ-

हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपले शिक्षण बंद पडू दिले नाही आणि याच जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर तो आज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. घोड्यावर बसून काढलेली ही मिरवणूक आहे. ज्ञानेश्वर देवकते याची. ऊसतोड मजुराच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. १० वीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कधी हमाली केली, तर कधी शेतात काम केले आहे. ज्ञानेश्वर पोलीस व्हावा याकरिता त्याच्या आई- वडिलांनी देखील शेतामध्ये मोलमजुरी करून त्याला पैसे पुरवले होते. (beed The Hamal son became PSI)

हे देखील पहा-

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा पोलीस होण्याची त्याची पहिली संधी ही ६ गुण कमी पडले म्हणून हुकली होती. तरीदेखील त्यांनी हार आणि खचून न जाता परत प्रयत्न सुरु केले आणि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने २४८ गुण मिळवले आहेत. ज्ञानेश्वरचे आई- वडील ऊसतोड मजूर आहेत. मोलमजुरी आणि स्वतःच्या ३ एकर शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह चालत असायचा अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आई- वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही.

Beed: हमालाचा मुलगा बनला PSI; खाकीचे स्वप्न उतरले सत्यात...(पहा Video)
धक्कादायक! बसस्थानकामधील बसमध्येचं, 60 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

परिस्थितीमुळे ज्ञानेश्वर लाही वडिलाबरोबर ऊस तोडावा लागला तर कधी शेतात मोलमजुरी करावी लागली आहे. पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने ५ वर्ष अथक परिश्रम घेतले होते. मोठ्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करणे परिस्थितीमुळे शक्य नव्हते. यामुळे त्यांनी बीड मध्येच राहून आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्या यशाविषयी संपूर्ण जिल्ह्याभर त्याचे कौतुक होताना दिसून येत आहे.

ग्रामीण भागात अनेक मुले- मुली स्पर्धा परीक्षेकरिता आपले गाव, घर सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जात आहेत. पण काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणे, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरलेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com