Beed Crime
Beed Crimeविनोद जिरे

धक्कादायक! बसस्थानकामधील बसमध्येचं, 60 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

हत्या की आत्महत्या? पोलिसांकडून तपास सुरू
Published on

बीड: बीड (Beed) शहरातील बसस्थानकामध्ये एका जवळपास 60 वर्षीय वयाच्या अज्ञात व्यक्तीचा, बसमध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना काही वेळापूर्वी उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती समजताच शिवाजी नगर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

बीड (Beed) शहरातील बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या बसमध्ये हा मृतदेह आढळला आहे. गळ्याला फास लावलेल्या व पाय खाली टेकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे. निवृत्ती अबुज वय 60 असं त्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी (Police) मृतदेह खाली उतरवला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

Beed Crime
आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग; रस्त्यावरच रुग्णावर उपचार

दरम्यान मयत व्यक्ती कोण हे स्पष्ट झाले असून पोलिसांकडून (Police) पंचनामा करत तपास सुरू आहे. तर मयत व्यक्तीने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या केली? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com