ED officials conduct raids and arrest Punjab cabinet minister Sanjeev Arora in a major money laundering investigation. Saam TV Marathi
देश विदेश

पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Sanjeev Arora, ED raid Punjab : पंजाबच्या आप सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना ईडीने अटक केली आहे. बनावट GST बिले आणि १०० कोटींच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली.

Namdeo Kumbhar

Sanjeev Arora latest news : पंजाबच्या आप सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना ईडीने बेड्या ठोकल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बनावट जीएसटी खरेदी बिले आणि १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मनी लाँड्रिंगच्या कथित प्रकरणात ईडीने अरोरा यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी सात खासदारांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पंजाबमध्ये ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. या कारवाईमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ईडीने शनिवारी सुमारे सात तास पंजाबमध्ये अरोरा यांच्या घरी तपास केला. या छाप्यानंतर ईडीने अरोरा यांना मनी लाँड्रिंगच्या कथित प्रकरणात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, अरोरा यांना चंदीगडमधील सरकारी निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यांच्या मुलालाही अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. ईडीने आज सकाळी चंदीगडसह अरोरा यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते.

छापा मारताना सुरक्षेसाठी ३ डझन सीआयए (CIA) आणि एसएफ (SF) जवान तैनात करण्यात आले होते. या छापेमारीवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमधील संजीव अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार ठिकाणांवर ईडीने सकाळी ७ वाजता धाड टाकली होती. सात तास तपास केल्यानंतर संजीव अरोरा आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. संजीव अरोरा यांना अटक केल्यानंतर आप सरकारने भाजपवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT