पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या ४० उमेदवारांची पहिली यादी
भगवंत मान धुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार
आम आदमी पार्टीने ३७ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली संधी
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे देखील या यादीमध्ये नाव आहे. ते धुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शुक्रवारी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत, अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि मनीष सिसोदिया या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी ३१ ऑक्टोबरला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले होते.
भगवंत मान यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अनेक नावांवर चर्चा झाली. अंतिम निवड झालेली नावं शुक्रवारी संध्याकाळी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीकडे पाठवण्यात आली. या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशीच सर्व नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर आज लगेचच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. भगवंत मान यांनी सांगितले की, उमेदवारांची निवड करताना जनतेचा अभिप्राय आणि विद्यमान आमदारांची कामगिरी विचारत घेण्यात आली.
अमृतसर दक्षिणमधून डॉ. इंदरबीर सिंग निज्जर, नकोदरमधून इंदरजीत कौर मानस करमबीर सिंग घुमन, तरनतारनमधून हरमीत सिंग संधू, बटालामधून शैरी कालसी, अजनालामधून कुलदीप धालीवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत खेमकरणमधून सरवण सिंग धुन, करतारपूरमधून बलकार सिंग आणि उडमूडमधून जसवीर सिंग राजा गिल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
पहिल्या यादीत अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा हे देखील लुधियाना पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पार्टीने आपल्या पहिल्या यादीमध्ये ३७ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ४० नावांच्या या यादीत पक्षाने आपल्या अनेक विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला. उमेदवारांच्या निवडीसोबत पक्षाने निवडणूक संघटना सक्रीय करण्यासाठी एक रणनीतीही तयार केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.