High Court Saam Tv
देश विदेश

High Court: 'नोकरीच्या तणावामुळे मृत्यू, कुटुंबाला मिळणार पेंशन', हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Punjab and Haryana High Court: नोकरीच्या तणावामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पेन्शन देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. नेमकं प्रकरण काय होते वाचा....

Priya More

Summary -

  • नोकरीच्या तणावामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्याचा हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला.

  • पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली.

  • जवानाच्या आईला मुलाच्या मृत्यूच्या तारखेपासून विशेष कुटुंब पेन्शन देण्याचे कोर्टाचे निर्देश.

नोकरीच्या तणावामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेंशन मिळणार असल्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय हायकोर्टाने घेतला आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने लष्कराच्या एका जवानाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्या प्रकरणात हा निर्णय दिला आहे. याप्रकरणात मृत जवानाच्या कुटुंबीयांना विशेष कुटुंब पेन्शन देण्याचे कोर्टाने सांगितले. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे जवानाच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला.

त्याचसोबत हायकोर्टाने आपल्या निर्णयात असे म्हटले आहे की, 'लष्करात दीर्घकाळापर्यंतचा ताण आणि मानसिक तणाव कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे संभाव्य कारण असू शकते.' तसंच, कोर्टाने मान्य केले की, सैनिकांना त्यांच्या सेवेदरम्यान कठोर परिस्थितीत, शिस्तीत आणि सतत तणावपूर्ण वातावरणात काम करावे लागते. म्हणून जर एखाद्या सैनिकाचा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने मृत्यू झाला तर तो सेवेशी संबंधित परिस्थितीचा परिणाम मानला जाऊ शकतो.

हायकोर्टाने पुढे असे देखील स्पष्ट केले की, 'लष्कराचे कर्मचारी सतत अशा परिस्थितीत काम करतात जिथे मानसिक आणि शारीरिक ताण त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग असतो. अशा परिस्थितीत कॅन्सरसारख्या आजारांचा विकास हा सेवेशी संबंधित नसलेला मानला जाऊ शकत नाही.' या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करत हायकोर्टाने जवानाच्या कुटुंबाला विशेष कुटुंब पेन्शन देण्याबाबत पूर्वी जारी केलेला आदेश कायम ठेवला. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे जवानाच्या कुटुंबाला दिलासा मिळाला. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे न्यायव्यवस्था लष्करी कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य त्यांच्या सेवेशी थेट जोडलेले असल्याचे देखील दर्शवत असल्याचे स्पष्ट होते.

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने चंदीगड येथील सशस्त्र दल न्यायाधिकरणने जारी केलेल्या २०१९ च्या विशेष कुटुंब पेन्शन आदेशाला आव्हान देणारी केंद्र सरकारची याचिका फेटाळून लावली. न्यायाधिकरणाने सैनिकाची आई कुमारी सलोनचा वर्मा यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या तारखेपासून विशेष कुटुंब पेन्शन देण्याचे निर्देश दिले. हायकोर्टाने असे देखील सांगितले की, 'सैनिकांना त्यांच्या लष्करी सेवेदरम्यान दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. ज्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून हे आजार सेवेशी संबंधित मानले जाऊ शकतात आणि अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाला विशेष पेन्शन नाकारता येत नाही.'

हायकोर्टाने सैनिकाची आई कुमारी सलोनचा वर्मा यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या तारखेपासून विशेष कुटुंब पेन्शन देण्याचे निर्देश दिले. हायकोर्टाने म्हटले आहे की, सैनिकांना त्यांच्या लष्करी सेवेदरम्यान दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. ज्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून हे आजार सेवेशी संबंधित मानले जाऊ शकतात आणि अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाला विशेष पेन्शन नाकारता येत नाही असे देखील कोर्टाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणेकरांसाठी गुड न्यूज! डिसेंबरमध्ये मेट्रोचे २ नवे मार्ग सुरू होणार, सरनाईकांनी दिली डेडलाईन, वाचा सविस्तर

Colorectal Cancer: सारखं पोट दुखतेय, कोलोरेक्टल कॅन्सर तर नाही ना? आताच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं

Prasar Bharati Recruitment: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; पगार ३ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

Diwali Rangoli : छापा - ठिपक्यांची नाही, यंदा घरासमोर काढा 'मोराची' सुंदर रांगोळी

SCROLL FOR NEXT