ACTRESS TANIA KAMBOJ’S FATHER SHOT IN PUNJAB CLINIC ATTACK Saam tv news
देश विदेश

Actress Father: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Gunmen Open Fire on Actress at Father: पंजाबमध्ये अभिनेत्री तानिया कंबोज यांचे वडील डॉ. अनिल कंबोज यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर धाडधाड गोळीबार करण्यात आला आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी मिळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही धक्कादायक घटना पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोट इसे खान या परिसरात घडली असून, अभिनेत्रीचे वडील व्यावसायाने डॉक्टर आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पंजाबची अभिनेत्री तानिया कंबोज यांचे वडील डॉ. अनिल जीत सिंग यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेच्या दिवशी डॉ. अनिल जीत सिंग हे आपल्या क्लिनिकमध्ये काम करत होते. यादरम्यान, काही हल्लेखोर मोटारसायकलवरून आले. त्यांनी पिस्तूल काढत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर तेथून थेट पळ काढला.

गोळीबारानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डॉ. कंबोज यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना नर्सिंग होम परिसरात घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉ. कंबोज यांच्या क्लिनिकमध्ये हल्लेखोर आले. त्यांनी अचानक डॉक्टरांवर हल्ला चढवला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला', अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर डॉ. कंबोज यांची मुलगी अभिनेत्री तानियाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'माझ्या वडिलांवर हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. भावनिकदृष्ट्या आम्ही फार कठिण काळातून जात आहोत. कृपया कुठलीही अफवा पसरवू नका. आम्हाला शांतता हवी', असं म्हणत तानियाने वडिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

Tuesday Horoscope : रखडलेली कामे पूर्ण होणार, ६ राशींच्या व्यक्तींनी घ्या विशेष काळजी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

एकविरा देवीच्या दर्शनासाठी कल्याणहून गेलेल्या भाविकांना स्थानिकांकडून मारहाण; संतापजनक घटना

Badlapur Tourism : पावसाळ्यात वन डे ट्रिप प्लान करताय? बदलापूर ठरेल परफेक्ट, नक्की फिरा 'ही' ५ सुंदर ठिकाणे

Kidney Damage: किडनीच्या आरोग्यासाठी वरदान आहे ‘हे’ फळ! रोज खाल्ल्याने विषारी घटक बाहेर पडून किडनीचे कार्य सुधारेल

SCROLL FOR NEXT