Flood rescue operation: पंजाबमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पूरसदृश्य स्थितीमुळे हजारो घरांचं नुकसान झालं आहे. या पुरामुळे अनेक जण बेघर झालेले असताना दुसरीकडे एका तरुणाला तब्बल ३५ वर्षांनी आई सापडल्याने त्याच्या घराला घरपण मिळालं आहे. (Latest Marathi News)
३५ वर्षीय जगजीत सिंग हा पंजाबमध्ये राहतो. या भीषण पुरात स्वयंसेवकाचं काम करणाऱ्या जगजीतला त्याची आई भेटली. या दोन्ही मायलेकाची भेट ३५ वर्षांनी झाली. या घटनेची देशभर चर्चा होत आहे. जगजीत सिंगची २० जुलै रोजी त्याच्या आईसोबत भेट झाली.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, जगजीत सहा महिन्याचा होता, त्यावेळी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर जगजीतच्या आईने दुसरं लग्न केलं. पुढे जगजीत २ वर्षांचा असताना आजी-आजोबांनी त्याला घरी नेलं. त्यांनीच जगजीतचा सांभाळ केला.
जगजीत मोठा झाला, तेव्हा आजी-आजोबांनी त्याला आई-वडिलांचं अपघातात निधन झाल्याचं सांगितलं. मात्र, ३५ वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर या ताटातूट झालेल्या मायलेकाची भेट झाली.
भीषण पुरात स्वयंसेवकाचं काम करणाऱ्या जगजीत सिंगला त्याच्या आत्याने सांगितलं की, 'त्याच्या आईच्या आईचं घर पतियाळा येथे आहे. जगजीत सिंग बोहरापूरला पोहोचला, त्यानंतर त्याची आजी प्रीतम कौर यांना भेटला. त्यावेळी जगजीत सिंग त्याच्या आजीशी बोलताना म्हणाला, 'मी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना संशय आला. तेव्हा त्याने मी आई हरजीत यांच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. मी तीन दशकांहून अधिक काळ माझ्या आईला पाहू शकलो नाही'.
दरम्यान, हरजीत कौर या आजारी असल्याने सध्या चालता येणं शक्य नाही. जगजीतला पाच वर्षांपूर्वीच कळालं होतं की, त्याची आई जीवंत आहे. जगजीत म्हणाला, 'माझ्या जवळ अधिक माहिती नव्हती. माझ्या आईबद्दल ज्यांना माहिती होतं, त्या सर्व लोकांचं निधन झालं होतं. आई आणि वडिलांच्या कुटुंबामध्ये कटुता आल्याने कधीही त्यांनी आईच्या आई-वडिलांची माहिती दिली नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.