GBS News pune 
देश विदेश

Pune GBS News : पुण्यात जीबीएसचं थैमान; एकाचा मृत्यू, केंद्र सरकार अलर्ट, पथक पाठवलं!

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : पुण्यात जीबीएस आजार दिवसेंदिवस फोफावत आहे, त्याची व्याप्ती आता महाराष्ट्रात पोहचण्याची शक्यता आहे. नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये जीबीएसचे रूग्ण आढळले आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे साम टीव्ही प्रतिनिधी

GBS Pune News in marathi : गेल्या काही दिवासांपासून पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत पुण्यात १११ रूग्ण आढळले आहेत. त्याशिवाय सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये दोन दोन रूग्ण आढळले आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये सहा रूग्ण आढळले आहेत. जीबीएस आजाराची वाढती व्याप्ती पाहाता केंद्राकडून पावले उचलण्यात आली आहे. केंद्र सरकारने 'जीबीएस' आजारासंदर्भात केंद्रीय पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक महाराष्ट्रात दाखल झालेय.

गुलियन बॅरे सिंड्रोम ( जीबीएस)ची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आणि बहु-विषयक पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. जीबीएसच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेता राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदतीसाठी तज्ञांचे एक पथक पुण्यात पाठविण्यात आले आहे. पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे थैमान सुरू असून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पथक नेमकं काम कसं करणार?

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय आणि पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी च्या सात तज्ज्ञांचा समावेश आहे.

पुण्यातील एनआयव्हीचे तीन तज्ज्ञ स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

हे पथक राज्याच्या आरोग्य विभागासोबत काम करेल आणि जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आणि राज्याशी समन्वय साधून सक्रिय पावले उचलत आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून जीबीएसचा आढावा, आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना -

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर आणि विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी राज्य शासनाचे आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पुणे महानगर पालिका यांच्याकडून आढावा घेतला. या आजाराचे आजअखेर 111 आणि आज ससून रुग्णालयाने कळविल्याप्रमाणे 10 संशयित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोड, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तर काही रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि इतर जिल्ह्यातील आहेत.

या रुग्णांचा योग्य मार्ग (ट्रेस) ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन त्यांना कोणत्या कारणामुळे हा आजार झाला हे कळून येईल. दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्यावत करावी. त्यासाठी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत. बाटलीबंद पाण्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासावेत. जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याची महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाने तपासणी करावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT