आपत्कालीन लँडिंगदरम्यान विमान कोसळले
हा विमान अपघात अमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये झाला
विमान अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला
अपघातानंतर विमानाला भीषण आग
थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेत लँडिंगदरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली. मध्य मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करताना प्रायव्हेट जेट कोसळले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर विमान पूर्णत: जळून खाक झाले.
मेक्सिको राज्य नागरी संरक्षण समन्वयक एड्रियन हर्नांडेझ यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मेक्सिको शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतर पश्चिमेला आणि टोलुका विमानतळापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सॅन माटेओ अटेंको येथे हा अपघात झाला. विमानाने मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को येथून उड्डाण घेतले होते. विमानात आठ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर ७ जणांचे मृतदेह सापडले इतर जणांचा शोध घेतला जात आहे.
प्रायव्हेट जेटने फुटबॉल मैदानावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण हे विमान जवळच्या कारखान्याच्या छतावर आदळले आणि अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागली. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सॅन माटेओ अटेंकोच्या महापौर अना मुनिझ यांनी मिलेनियो टेलिव्हिजनला सांगितले की, आगीमुळे सुरक्षेच्या उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरातून सुमारे १३० लोकांना बाहेर काढले आहे.
हे विमान सेस्ना ६५० सायटेशन III होते. ज्याचे नोंदणीकृत XA-PRO होते. जे सर्व्हिसेस एरोस एस्ट्रेलाद्वारे चालवले जात होते. हे विमान कोसळण्यापूर्वी पायलटने विमानतळ नियंत्रण टॉवरला एमर्जन्सी मेसेज पाठवला होता. ज्यामध्ये विमान खाली पडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही सेकंदांनंतर एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे उंच लोट पाहायला मिळाले. जे अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते.
विमान कोसळल्याच्या घटनेनंतर मेक्सिको आणि टोलुका नगरपालिकेच्या आपत्कालीन सेवांनी तात्काळ मदत केली. आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तासांहून अधिक वेळ गेला. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर आग अटोक्यात आली. जवळच गॅस आणि इंधन टाक्या असल्याने नागरी संरक्षण विभागाने जवळील चार ब्लॉक रिकामे केले आणि दोन दुकाने तात्पुरती बंद केली. या अपघाताच्या वेळी कार्यशाळा रिकामी होती त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.