Bus Caught Fire Saam Tv Twitter
देश विदेश

Bus Caught Fire: दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून मारल्या उड्या

Gurugram Bus Fire : दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या एका खासगी बसने पेट घेतल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

Gurugram Private Bus Caught Fire:

गुरुग्राममधील स्टार मॉलजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एका खासगी स्लीपर बसला आग लागल्याची भीषण घटना घडलीय. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली.

किमान १० ते १२ प्रवाशांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत होरपळलेल्या लोकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बस दिल्लीहून जयपूरला जात होती. गुरुग्रामच्या सेक्टर ३१ जवळ ही बस आली असताना बसने पेट घेतला. या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बसने पेट घेतल्याचे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT