Narendra Modi Saam tv
देश विदेश

PM Modi Oath Ceremony: त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी प्रमुख शेजारी येणार; अंतिम यादी तयार

Guest List For Narendra Modi Oath Taking Ceremony: नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी प्रमुख शेजारी देशातील नेते येणार आहेत. या सोहळ्याच्या दिवशी दिल्लीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठला. यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता पंतप्रधानाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला शेजारी देशात राहणारे प्रमुख नेते देखील सोहळ्याला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्याला शेजारी देशातील प्रमुख पदावरील नेते सोहळ्याला येणार आहेत. यामध्ये बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, भूटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल, मालदीवचे राष्ट्राध्यश्र मोहम्मद मुइज्जू यांच्या समावेश आहे. या प्रमुख नेत्यांना ६ जून रोजी निमंत्रण धाडण्यात आलं.

परदेशात काम करणारे भारतीय वकील, डॉक्टर, कलाकार आणि काही प्रभावशाली व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच या कार्यक्रमाला विकसित भारताचे दूत, केंद्र सरकारचे लाभार्थी, आदिवासी महिला, सफाई कर्मचाऱ्यांनाही बोलवण्यात आलं आहे.

विविध धर्मातील ५० प्रतिष्ठित धर्मगुरू, नेत्यांना बोलवण्यात येणार आहे. पद्म पुरस्कार व्यक्तींनाही या सोहळ्याला बोलवण्यात आलं आहे. परदेशी पाहुण्यांना ताज पॅलेस, द ओबरॉय, द लीला पॅलेस सारख्या हॉटेलमध्ये थांबवण्याची शक्यता आहे.

सोहळ्याच्या दिवशी दिल्लीत कडक सुरक्षा

दिल्लीत रविवारी ९ जूनच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत पॅराल्गाइडर , पॅरा मोटर्स , हँग ग्लाइडर , मायक्रो एअरक्राफ्ट सारख्या उपकरणाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

सोहळ्याच्या जवळील परिसरात अनधिकृत वाहनांना बंदी असणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. दिल्लीतील सोहळा परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT