New Cabinet List Prediction: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? संभाव्य यादी आली समोर

Narendra Modi New Cabinet Minister List Prediction: नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. रविवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या शपथविधीला जगभरातून प्रमुख पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? संभाव्य यादी आली समोर
Narendra Modi Saam tv
Published On

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर ते सत्तास्थानी विराजमान होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचीही तयारी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातून मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील खासदारांची संभाव्य यादी समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या तयारासाठी बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणखी काही खासदार मंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेत्यांची मंत्रिपदाची वर्णी लागू शकते. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप, शिंदे गट, अजित पवार गटातील खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? संभाव्य यादी आली समोर
Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजमधून २ केंद्रीय मंत्री, २ राज्यमंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजमधील खासदार पियूष गोयल, नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील काही खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? संभाव्य यादी आली समोर
Odisha News: ओडिशाचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? धर्मेंद्र प्रधान, संबित पात्रा शर्यतीत; आज होणार घोषणा

अजित पवार गटाला मंत्रिपदाला मिळणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल पटेल यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्रफुल पटेल उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?

मोदी सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे 18 मंत्री असतील तर घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदं असतील, अशी माहिती मिळत आहे. टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी दोन मंत्री असणार आहेत. शिवसेना, एनसीपी, एलजीपी, जेडीए, हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रीपद मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com