Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?

Narendra Modi 3.0 Cabinet : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना स्थान देण्यात यावं, अशी मागणी काही खासदारांनी केली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?
Narendra Modi 3.0 CabinetSaam TV

लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (४ जून) जाहीर झाले. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळालं. त्यामुळे आता भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. येत्या ९ जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?
Narendra Modi : मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना स्थान देण्यात यावं, अशी मागणी काही खासदारांनी केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी शिवसेना शिंदे गटातील खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक खासदारांनी ही मागणी केली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार, श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या आहेत. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा कल्याण येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पराभूत केलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. ही मंत्रिपदं नेमकी कोणत्या खासदारांना द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी निवडून आलेल्या खासदारांनी महत्वाची बैठक बोलावली होती.

या बैठकीला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संदीपान भूमरे, रविद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या खासदारांनी मंत्रिपदाविषयी आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्यात यावं, असं सर्व खासदारांनी शिंदेंना सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?
Ajit Pawar Vs Supriya Sule: अजित पवार- सुप्रिया सुळेंमध्ये पुन्हा रंगणार सामना; बारामतीनंतर आता कारखान्याची लढाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com