Narendra Modi
Narendra Modi Saam Tv
देश विदेश

लता मंगेशकर यांनी मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं - नरेंद्र मोदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रविवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी मोदींनी संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांवर स्तुतीसुमनं उधळली. यावेळी लता मंगेशकर (lata Mangeshkar Award) यांच्या आठवणींना उजाळा देत मोदी म्हणाले, लतादीदींसोबत माझं नातं खूप जूनं आहे. संगीताला लतादींदीच्या रुपात साक्षात पाहिलं आहे. हे आपल्या सर्वांच भाग्य आहे. सुधीर फडके (Sudhir phadke) यांनी मागील चार-साडेचार दशंकांपूर्वी लता मंगेशकर यांच्याशी माझी ओळख करुन दिली होती. लता मंगेशकर माझी मोठी बहीण होती. लतादीदींनी मला बहिणीचं प्रेम दिलं. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं. अशा भावनिक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुरस्कार सोहळ्यात संगीत क्षेत्रातील महत्व सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संगीताच्या एका स्वरामुळं डोळ्यात अश्रू येतं. संगितातून वैराग्याचा बोध मिळतो. संगीतामध्ये मातृत्व आहे. संगीत एक साधना आणि भावना आहे. लतादीदींचा पुरस्कार स्विकारणं हे माझं दायित्व आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्व देशवासीयांना समर्पीत करतो. हा पुरस्कार सर्व जनतेचा आहे. लतादीदी नेहमी मला आशिर्वाद द्यायच्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच आदराची भावना आहे. मनुष्य त्याच्या वयानं नाही तर त्याच्या कार्याने मोठा होतो. असं लतादीदी मला नेहमी सांगायच्या. लतादीदींचं कार्य महान होतं. लोकं त्यांना आई सरस्वतीच्या रुपात पाहायचे. लतादीदींचं अध्यात्मावरही प्रेम होतं. गाण्याच्या रेकॉर्डींगला गेल्यावर त्या चप्पल काढायच्या. लताजदीदींच संगीत हे युवापीढीसाठी प्रेरणा आहे.

तसंच यावेळी मोदींनी लतादीदींच्या 'ये मेरे वतन के लोगो' 'जय हिंद की सेना' या गाण्यांचाही उल्लेख केला. तसंच मोदीं पुढे म्हणाले, मंगेशकर कुटुंबियांच देशाला मोठं योगदान आहे. लतादीदींनी त्यांच्या मेहनतीने पुण्यात मास्टर दिनानाथ रुग्णालय उभारलं. कोरोनाकाळातंही रुग्णसेवेसाठी या रुग्णालयाचं योगदान मोठं आहे. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितलं, भारत सर्वच क्षेत्रात पुढं जात आहे. विकासाचा अर्थ म्हणजे सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकास आणि सगळ्यांचा प्रयास असेही नरेंद्र मोदी म्हणाले. मला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मंगेशकर कुटुंबियांचं हृदयापासून आभार. अशा शब्दांत मोदींनी मंगेश कुटुंबियांचं आभार मानलं. तसंच हृद्यनाश मंगेशकर यांनी ललकरात लवकर बरं व्हावं. ते या पुरस्कार सोहळ्यासाठी यायला पाहिजे होते. असेही मोदी म्हणाले.

Edited By- Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT