चंदीगड : हाय सिक्युरिटी जेलजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी दाखल

Detonator Found
Detonator Foundsaam tv news
Published On

चंदीगड - शनिवारी सायंकाळी चंदीगडच्या हाय सिक्युरिटी (High security) असलेल्या बुडैल कारागृहाच्या (Burail jail) भिंतीजवळ एक संशयास्पद बॅग आढळून आली. बॅगेत स्फोटकं असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे तातडीने माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने तातडीने बॉम्ब शोधक पथक (Bomb Disposal Squad) आणि लष्करी छावणी चंडी मंदिर येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. दोन्ही पथके आपापल्या पद्धतीने तपास करत आहेत.

Detonator Found
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास CM उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची शक्यता

या हाय सिक्युरिटी कारागृहात अनेक हायप्रोफाईल गुन्हेगार आणि दहशतवादी कैद असल्याची माहिती आहे. येथील भिंत तोडून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचा कट रचला गेला आहे का? याची चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. दुसरीकडे, एसएसपी कुलदीप चहल यांनी आज तकला सांगितले की, प्राथमिक तपासात बॅगमधून डिटोनेटर आणि काही जळलेल्या वायर्स सापडल्या आहेत.

मात्र, अद्याप तपास सुरू आहे. बॅग सापडलेल्या संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून संशयित स्फोटकांची छायाचित्रे देखील समोर आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com