लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यास CM उद्धव ठाकरे गैरहजर राहण्याची शक्यता

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्काराने (Lata Mangeshkar award) सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनुपस्थित रहाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्तं केलीय. मुंबईत आज लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी हे मुंबईला येत आहेत. मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात संध्याकाळी ५ वाजता ८० वा मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा होणार आहे. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray
Ambernath Breaking : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

गेली दोन दिवस मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. यावेळी शिवसैनिकांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या संरक्षण आणि सन्मानासाठी जीवाची बाजी लावून दिवस रात्र आंदोलनं आणि निदर्शेने केली. या शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच लता मंगेशकर पुरस्कार सोहळा हा एक खासगी कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रम नाही आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यास राज शिष्टाचाराचे बंधनही नसल्याची माहिती आहे.

Edited By -Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com