पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना; उड्डाणासाठी वापरले पाकिस्तानचे हवाई क्षेत्र PMO Twitter/SaamTV
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना; उड्डाणासाठी वापरले पाकिस्तानचे हवाई क्षेत्र

यापुर्वी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास भारताला नकार दिला होता.

विहंग ठाकूर

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे अमेरिकेला जाणारे नॉन स्टॉप  विमान अफगाणिस्तान (Afganistan) मार्गे जाणार नाही. अफगाणिस्तानचा मार्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई (Pakistan's airspace) हद्दीवरून उड्डाण घेणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यापुर्वी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास भारताला नकार दिला होता.(Prime Minister Narendra Modi leaves for America)

हे देखील पहा -

भारताने 2019 मध्ये जम्मू -काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांना परदेशी प्रवासासाठी तीन वेळा पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती. मात्र आजच्या नरेंद्र मोंदींच्या दौऱ्याला जाण्यासाठी पाकिस्तनने आपले हवाई क्षेत्र वापरण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) या दोघांची 24 सप्टेंबरला वॉग्शिंटन येथे भेट होणाप आहे. जो बायडन सत्तेवर आल्यानंतर मोदींची ही पहिली भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालयानेत्यांचा (PMO Office) या दौऱ्यातील कार्यक्रम जाहीर केला आहे. पंतप्रधानांचा हा दौरा भारतासाठी महत्त्वाचा असून हिंदी महासागरात चीनचा (China) वाढता प्रभाव तसेच अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या घडामोडीसोबतच अमेरिका भारत व्यापारी संबंधांसाठी देखील हा मोदींचा अमेरिका दौरा महत्त्वाचा असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT