शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार पानिपत मध्ये; महाराष्ट्रातून मूर्ती हरियाणाकडे रवाना

पानिपथ आणि महाराष्ट्र हे नाते आणखी घट्ट होणार यात काही शंका नाही.
शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार पानिपत मध्ये; महाराष्ट्रातून मूर्ती हरियाणाकडे रवाना
शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार पानिपत मध्ये; महाराष्ट्रातून मूर्ती हरियाणाकडे रवानाअमोेल कविटकर

पुणे : महाराष्ट्रातून प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) राजदंड हाती घेऊन सिंहासनावर विराजमान असलेल्या मूर्तीची स्थापना हरियाणा राज्यतील पानिपत मध्ये करण्यात येणार आहे. रोड मराठा (Road Maratha) समाजविषयीची नाळ, प्रेम ,आपुलकी अधिक घट्ट व्हावे या करिता भोर तालुक्यातील मावळ्यांनी शिवाजी महाराज यांची मूर्ती पानिपत मधील रोड मराठा बाधवांना नतमस्तक होण्यासाठी दिली आहे. (Idol of Shivaji Maharaj will be erected in Panipat)

हे देखील पहा -

पानिपताच्या युध्दापासूनच हरियाना (Hariyana) भागात अनेक मराठी बांधव तिकडे स्थायिक झाले आहेत आणि आत्ताच झालेल्या ऑलम्पिक (Olympic) मध्ये निरज चोप्राने (Niraj Chopra) गोल्ड मेडल (Gold Medal) मिळवल्यानंतर देखील आपणाला मराठा रोड आणि तिथे असणारा मराठी समाजवर्ग याची माहिती माध्यमांमधून मिळाली होती अशातच आता मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव विराजमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्तीच तिथे स्थापना केल्याने पानिपथ आणि महाराष्ट्र हे नाते आणखी घट्ट होणार यात काही शंका नाही.

शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार पानिपत मध्ये; महाराष्ट्रातून मूर्ती हरियाणाकडे रवाना
नियम न पाळणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना परवानगी, मग नियम पाळणाऱ्या नाटकांना का नाही; अतुल पेठेंचा सवाल!

दरम्यान या मुर्तीचे भोर मध्ये पूजन करून ती पानिपतच्या दिशेने रवाना करण्यात आली. असून दिनांक26 सप्टेंबरला मोठ्या उत्साहात पानिपत मध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com