Narendra Modi With Lata Mangeshkar & Family saam tv
देश विदेश

Lata Mangeshkar : लता दीदींना एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता : नरेंद्र माेदी

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. आज देशात जी पोकळी निर्माण झाली आहे कधीच भरुन येऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र माेदी (prime minsiter narendra modi) यांनी लता मंगेशकर यांना अदारांजली वाहिली आहे. (Lata Mangeshkar Marathi News)

नरेंद्र माेदी म्हणाले लता दीदींच्या गाण्यांनी विविध प्रकारच्या भावना प्रकट केल्या. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्या नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट असायच्या. त्यांनी नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. (Lata Mangeshkar Latest Marathi News)

माेदी पुंढ म्हणतात लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. (Lata Mangeshkar Latest News)

'स्वर कोकिळा' लता मंगेशकर यांच्या निधनाने भारताचा आवाज हरपला आहे. त्यांनी गायलेली गाणी भारतातील अनेक पिढ्यांनी ऐकली आणि गायली आहेत. त्यांच्या निधनाने देशाच्या कला आणि संस्कृती जगताची मोठी हानी झाली आहे अशी भावना देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी व्यक्त केली आहे.

लतादीदींचा स्नेह आणि आशीर्वाद वेळोवेळी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्या अतुलनीय देशभक्ती, गोड बोलणे आणि सभ्यपणाने सदैव आपल्यात राहील अशी भावना देशाचे गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी लता मंगेशकर यांना अदारांजली वाहताना व्यक्त केली आहे.

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी ट्विट करुन अदारांजली वाहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT