मुंबई : संगीताच्या जगात आपली हयात घालवणाऱ्या भारताच्या गायिका भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यांच्या जाण्याने सर्व चाहत्यांनी आणि संबंध भारतातील लोकांना धक्का बसला आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी निगडीत अनेक जुन्या कथा समोर येत आहेत.
हे देखील पहा-
यात एक किस्सा त्याच्या सुरुवातीच्या काळाच्या संबंधित आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भारतीय चित्रपटसृष्टीत (movies) 'गाण सम्राज्ञी' ही उपादी दिलेली आहे. पण इंडस्ट्रीत हे स्थान मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य संघर्षात गेले. शाळेची फी न भरल्यामुळे त्यांना अनेक शिक्षणापासून वंचित राहाव लागत होते. मात्र, त्यांना त्यांच्या मधुर आवाजाचा वारसा त्यांचे वडील आणि नाट्य कलाकार आणि गायक पंडित दीनानाथ मंगेशकर (Pandit Dinanath Mangeshkar) यांच्याकडून मिळाला. लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच गायिका बनण्याची आवड होती.
वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. दीदींच्या वडिलांना त्यांचे चित्रपटातील गाण गाणे आवडत नसले तरी वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना चित्रपटात गाणं गावं लागलं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या आयुष्यातील पहिली कमाई 25 रुपये मिळाली होती. 1942 मध्ये त्यांनी 'किटी हसाल'साठी पहिले गाणे गायले होते. सुरुवातीला लता मंगेशकर यांना आवाज बारीक आहे म्हणून काम नाकारले गेले होते. परंतु, काळाच्या ओघात त्यांनी सूर, तालावर आपले प्रभुत्व मिळवले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.