राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? राजेश टोपेंनी शाळांबाबत दिले महत्वाचे संकेत

आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १ वर्ष पूर्ण झाले आहे.
राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? राजेश टोपेंनी शाळांबाबत दिले महत्वाचे संकेत
राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? राजेश टोपेंनी शाळांबाबत दिले महत्वाचे संकेतSaam Tv

जालना: आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccine)१ वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यामध्ये आपण ९० टक्के लोकांना पहिला डोस (Dose) देण्यात आला आहे. दोन डोस ६२ टक्के लोकांना लस दिले आहे. आणखी आपल्याला काम करायचे आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यावेळी म्हणाले आहेत. १५ ते १८ वयोगटातील ४२ टक्के लसीकरण (Vaccination) पूर्ण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्याने आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे.

लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये (hospital) जाणाऱ्यांची संख्या देखील कमी असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाबाधितांपैकी (Corona Patient) ८६ ते ८७ टक्के लोक होम क्वारटाईन आहेत. यामुळे लसीकरण करणे महत्वाचे आहे. शाळेच्या विषयी मंत्रीमंडळात (cabinet) चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्याविषयी पालकांमध्ये २ मतप्रवाह आहेत. मात्र १५ दिवसात शाळा सुरु करण्याविषयी निर्णय घेणार असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत. ६० लाख मुलांचे लसीकरण करायचे आहे.

हे देखील पहा-

त्याकरिता कोवॅक्सिन आवश्यक असून बुस्टर डोस लसीकरण देखील सुरु झाले आहे, ते देणे गरजेचे आहे. आम्ही महिन्याचे हिशोब करुन ५० लाख कोविशिल्ड मागणी केली होती. केंद्र आम्हाला लस उपलब्ध करुन देत नाही, असे कधीच आम्ही बोलो नाही, असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ८ लाख लसी आपण रोज देत आहोत. महिन्याबराचसाठा असावा म्हणून लसी मागितल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी म्हटले आहे. ज्या जिल्ह्यात (district) लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असेल, त्याठिकाणी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिले आहेत. त्यांना लसीकरणाविषयी पावले टाकण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? राजेश टोपेंनी शाळांबाबत दिले महत्वाचे संकेत
औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून

शाळेच्या विषयी मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्याविषयी पालकांमध्ये २ मतप्रवाह आहेत. शाळा विषयी १५ दिवसाच्या परिस्थिती नुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत. कोरोना आणि ओमिक्रॉनविषयी (Omicron) लोकांच्या मनात भीती कमी झाली आहे. पण लोकांनी स्वत: सतर्कता बाळागावी, असे देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी बोलताना देखील राजेश टोपे यांनी रुग्णालयाला दररोज मेडिकल बुलेटिन जारी करावे, असे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये झालेल्या गर्दी संदर्भात विचारले असता सर्वांना नियम सारखे आहेत, गर्दी सर्वांनी टाळावी. राजकिय नेते, व्यापारी असेल किंवा सामान्य लोक असेल त्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com