Narendra Modi on Bihar Result  Saam tv
देश विदेश

Narendra Modi : बिहारमध्ये कोणता फॉर्म्युला यशस्वी ठरला? PM नरेंद्र मोदींनी सगळंच सांगितलं

Narendra Modi on Bihar Result : बिहारमध्ये विजयाची खात्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

Vishal Gangurde

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं आहे. एनडीएने विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. बिहार विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप ९० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. बिहारमधील निकालानंतर भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. या जल्लोषानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी बिहारच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

बिहार विधानसभा निवडणुकीत ९० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपने सायंकाळी ७ पर्यंत ६३ जागा जिंकल्या. तर जनता दल यूनायडेटने ४५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षानेही १० जागा जिंकल्या. या मतमोजणीदरम्यान विजयाची खात्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी बिहारच्या लोकांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

बिहारमध्ये विरोधकांचा सुफडा साफ केलाय. आज बिहारच्या लोकांनी घरघरात मखान्याची खीर बनवण्याचं निश्चित केलं. आम्ही जनतेचं हृदय चोरून बसलो आहे. यामुळे संपूर्ण बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार असल्याचे निश्चित केलं. मी निवडणुकीत वारंवार सांगितलं होतं की, बिहारच्या निवडणुकीत जंगलराजवर बोलत होतो. कट्टाराजवर बोलत होतो. माझा विरोध आरजेडी नव्हे तर काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला. आता पुन्हा कट्टाराज सरकार पुन्हा येणार नाही. बिहारच्या लोकांनी विकसित बिहारसाठी मतदान केलं आहे. त्यांनी समृद्ध बिहारसाठी मतदान केलं.

बिहारच्या लोकांना विक्रमी मतदान करण्याचां आवाहन केलं. त्यानंतर लोकांनी विक्रमी मतदान केलं. माझा आग्रह बिहारच्या लोकांनी मान्य केला. बिहारच्या लोकांनी सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिला. बिहारच्या महान जनतेचे आभार आणि नमन करतो. मी आज लोकनायक जयप्रकाश नारायण, भारकरत्न कर्पुरी ठाकूरजी यांना नमन करतो. मी कर्पुरी यांच्या गावातून प्रचाराला सुरुवात केली. आता आपल्याला बिहारला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे.

लोह लोहाला कापतं. बिहारमध्ये ध्रुवीकरणाचा फॉर्म्युला बनवला होता. या निवडणुकीत एमवाय (MY) हा फॉर्म्युला दिला आहे. एम म्हणजे महिला आणि वाय म्हणजे युवक. आज बिहारमध्ये सर्वाधिक युवकांची संख्या आहे. त्यांची इच्छा आणि आकांक्षा या फॉर्म्युल्याने विरोधकांना उध्वस्त केलं. बिहारच्या लोकांना नमन करतो. युवक, शेतकरी, महिला, मच्छिमारांना नमन करतो. नितीश कुमार यांनी चांगलं नेतृत्व दिलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, सम्राट चौधरी यांनी चांगलं नेत्वृत्व केलं. जीतन राम मांझी आणि चिराग पासवान यांनी चांगलं नेतृत्व केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT