Medicine  Saam Tv
देश विदेश

महागाईचा फटका! एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ होणार

सरकारने शेड्यूल्ड औषधांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

वृत्तसंस्था

जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीसोबतच आता औषधांच्या किंमतीही वाढणार आहे. यामध्ये अँटिबायोटिक्स पासून ते पेन किलर पर्यंतच्या आठशे औषधांचा समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिली आहे. या औषधांवर (Medicine) सरकारचे नियंत्रण असते आणि परवानगीशिवाय या शेड्यूल्ड औषधांचे दर वाढवता येत नाहीत. भारतामध्ये शेड्यूल प्रकारात 800 पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे.

हे देखील पहा -

एका वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार , नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीकडून शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्यापासून 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत.

अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये मधुमेह, कर्करोगावरील औषधे, हिपॅटायटीस, उच्च रक्तदाब, किडनी रोग इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 875 हून अधिक औषधांचा समावेश आहे.

औषधांच्या किमती कशा वाढतात?

औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च देखील वाढला आहे.त्यामुळे औषधांची विक्रीपूर्वीच्या दरात करणे परवडत नसल्याने औषधांचे दर वाढवण्याची मागणी करण्यात येत होती, असे एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT