Uttar Pradesh: योगी सरकारमधीले एकमेव तरुण मुस्लिम मंत्री कोण आहेत?

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दानिश आझाद अन्सारी यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.
Danish Azad Ansari
Danish Azad AnsariSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील योगी सरकारची दुसरी टर्म सुरु झाली आहे. काल योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत अन्य मंत्र्यांनीही शपथ घेतली. या मंत्री मंडळामध्ये एका मुस्लिम तरुणाने मंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दानिश आझाद अन्सारी यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व नेत्यांसोबत अन्सारी यांनीही शुक्रवारी 25 मार्च रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली.

योगी (Yogi Aditynath) सरकारमधील मुस्लिम चेहरा असलेले मोहसीन रझा यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. रझा हे अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्री होते.

दानिश आझाद अन्सारी (Danish Azad Ansari) बलिया येथील आहेत. योगी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये ते भाषा समितीचे सदस्य होते. अन्सारी यांनी लखनौ विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणाची सुरुवात केली. विद्यार्थी राजकारणाच्या काळात अन्सारी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (ABVP) अनेक पदे भूषवली आहेत. दानिश यांची अल्पसंख्याक समाज आणि तरुणांमधील सक्रियता पाहून भाजपने त्यांना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मंत्री मंडळात स्थान दिले आहे. मोहसीन रझा हे शिया आणि मुस्लिम सवर्ण जातीतून येतात, तर दानिश मुस्लिम ओबीसींच्या समुदायातून येतात.

दानिश अन्सारी (Danish Azad Ansari) यांना योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे मानले जातात. ते यूपी सरकारच्या फखरुद्दीन अली अहमद मेमोरियल कमिटीचे सदस्यही आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून पूर्ण केले आणि लखनौ येथून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दानिश अन्सारी हा बलियातील बसंतपूरचा रहिवासी आहे.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या अन्सारी समाजाची आहे. पण त्यांचा सत्तेतील सहभाग कमी आहे. आतापर्यंत पसमांडा समाजावर शेख, पठाण, सय्यद, मुस्लिम राजपूत इत्यादी उच्चवर्णीयांचे वर्चस्व राहिले आहे.

योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीनंतर 52 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com