President Murmu Spech 
देश विदेश

President Murmu Speech: दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या कमी होतेय; भारत लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होणार: राष्ट्रपती मुर्मू

President Murmu Speech: भारत पाचवी अर्थव्यवस्था होणं आणि तिसऱ्या होण्याच्या उंबरठ्यावर असणं हे शेतकरी आणि कामगारांच्या अथक परिश्रमाने शक्य झालंय. देशातील गरिबी कमी होत असल्याचं देखील राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

Bharat Jadhav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील नागरिकांना संबोधित केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात सरकारी योजनांचं कौतुक केलं. सामाजिक न्याय हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. भारतातील सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये समावेशाची भावना पसरलेली आहे आणि "समावेशाचे साधन म्हणून सकारात्मक कृती मजबूत करणे आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.

भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०२१ ते २०२४ पर्यंत भारताची अर्थव्यवस्थेची वाढ वार्षिक सरासरी ८ टक्के इतकी राहिलीय. "यामुळे लोकांच्या हातात फक्त जास्त पैसा आला. लोकांच्या हातात जास्त आलाच नाही तर दारिद्र्यरेषेखाली राहणारे लोकांचे जीवनमान देखील उच्चावले आहे. दारिद्र्यरेषेखाली राहणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झालीय. जे लोक अजूनही गरिबीत जीवन जगत आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रपती मुर्म यांनी केंद्र सरकारची पीएम गरीब अन्न योजनेचा उल्लेख करत त्या योजनेचं कौतुक केलं. कोविड-१९ च्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुमारे ८० कोटी लोकांना मोफत रेशन पुरवत आहे. योजनेमुळे गरिबीतून बाहेर आलेले लोक पुन्हा गरिबीत जाणार नाही यासाठी मदत झालीय.

भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय. आता लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनणार आहे. भारत पाचवी अर्थव्यवस्था होणं आणि तिसऱ्या होण्याच्या उंबरठ्यावर असणं हे शेतकरी आणि कामगारांच्या अथक परिश्रमाने, योजनाकार आणि संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्या शेतकऱ्यांनी, आपल्या अन्नदात्याने, शेतीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त राहील याची खात्री केली. यासह भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यात आणि आपल्या लोकांना अन्न पुरवण्यात मोठे योगदान दिले आहे.

अलिकडच्या वर्षांत पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे आणि धोरणात्मक नियोजन आणि प्रभावी संस्थांनी रस्ते आणि महामार्ग, रेल्वे तसेच बंदरांचे जाळे विस्तारण्यास मदत केलीय. "फ्युचरिस्टिक तंत्रज्ञानाची मोठी क्षमता लक्षात घेऊन, सरकारने सेमीकंडक्टर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या अनेक क्षेत्रांना जोमाने प्रोत्साहन दिले आहे. तसेच स्टार्टअप्ससाठी एक आदर्श परिसंस्था तयार केली असून त्यांच्या वाढीला चालना देईल. यामुळे भारत आणखी एक आकर्षक गुंतवणूक गंतव्य बनल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalarth Id Scam: शालार्थ आयडी घोटाळ्याची पुण्यात पाळंमुळं,मास्टरमाईंडला लाच घेताना रंगेहात पकडलं

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारला घरचा आहेर

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

SCROLL FOR NEXT