Prashant Kishor google
देश विदेश

Prashant Kishor Arrested: उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक, बिहारमधील राजकारण तापले

Patna Police: जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटे ३-४ च्या दरम्यान पाटणा पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले, ते बीपीएससी विरोधातील आंदोलनासाठी उपोषणाला बसले होते.

Dhanshri Shintre

बिहारमधील बीपीएससी परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पाटण्यातील गांधी मैदानात आमरण उपोषणाला बसलेल्या जन सुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर (पीके) यांना सोमवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. पहाटे ३-४ वाजण्याच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर प्रशांत किशोर यांना पाटण्यातील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात प्रशांत किशोर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, ज्यामुळे प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला आहे.

प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गांधी मैदानातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली. उपोषणस्थळी जन सुराजचे अनेक पोस्टर लावलेली वाहने उभी असल्याचे आढळले. प्रशांत किशोर ज्या ठिकाणी बेमुदत उपोषण करत होते, त्या परिसरातील प्रत्येक वाहनावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. या तपासणीमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बिहार पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं. ते बिहारमधील लोक आणि विद्यार्थ्यांसाठी गांधी मैदानात बेमुदत उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून पाटण्याच्या AIIMS रुग्णालयात नेलं, मात्र प्रशांत किशोर यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला. एम्सच्या बाहेर प्रशांत किशोर यांच्या समर्थक आणि पाटणा पोलिसांमध्ये झटापट झाली.

गांधी मैदानातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना उचलून रुग्णवाहिकेतून AIIMS दाखल केलं. नंतर त्यांना नौबतपूर येथे नेण्यात आलं. या घटनेमुळे प्रशांत किशोर यांच्या आंदोलनाला राजकीय रंग चढला आहे. त्यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध करत सरकारवर कारवाईची मागणी केली आहे. सरकारी निर्णय आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशांत किशोर यांनी पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी बीपीएससी गैरप्रकारांबाबत 7 जानेवारीला हाय कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. “तेजस्वी यादव हे मोठे नेते आणि विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले पाहिजे होते,” असे प्रशांत किशोर म्हणाले. जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले की, “राजकारण कधीही होऊ शकते, परंतु या आंदोलनात आमच्या पक्षाचा कुठलाही बॅनर नाही.” त्यांनी या लढ्याला पक्षीय राजकारणापलीकडे नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT