Bihar Politics  Saam Tv
देश विदेश

Politics: मुख्यमंत्री केंद्रात जाणार, निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश; आमदाराची कार फोडली

Nitish Kumar wants to join Rajya Sabha: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर जदयूच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमारांच्या निवासस्थानाबाहेर आक्रोश केला.

Priya More

Summary -

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची केली घोषणा

  • नितीश कुमार राज्यसभेवर जाणार

  • पाटणातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांनी राडा केला

  • एका आमदाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली

बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याची घोषणा केली. त्यांनी राज्यसभेचे खासदार बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले. गेल्या काही तासांपासून नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत केंद्रामध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे सांगितल्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. बिहारच्या पाटणामधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार राडा झाला.

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे सांगितल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. जदयूच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली. जदयूचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर राडा केला. जदयूच्या आमदाराची कार फोडली. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिस आणि आमदारांना धक्काबुक्की केली. यावेळी हिलसाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून पळून गेले. जदयूच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमार यांना केंद्रामध्ये जाऊ नका अशी विनंती केली.

नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर जदयूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यांनी पक्षाचे नेते कृष्ण मुरारी शरण यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यापासून रोखले. नितीश कुमार राज्यसभेत जाणार असल्याच्या निर्णयाचा जदयूच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ही भाजपची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला. नितीश कुमार केंद्रात जाणार यावर बोलताना काँग्रेस नेते रशीद अली यांनी सांगितले की, 'हे अगदी शक्य आहे. भाजपला नेहमीच पूर्ण सत्ता हवी असते, म्हणून विधानसभा निवडणुकीदरम्यानही भाजप स्वतःचा मुख्यमंत्री नियुक्त करेल अशी अपेक्षा होती.'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, 'माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासूनच मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. या अनुषंगाने मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करत आहे.' नितीश कुमार यांनी ही पोस्ट करताच जदयू कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नितीश कुमार राज्यसभेवार जाणार असल्यामुळे चिराग पासवान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : व्हीएसआर कंपनीचे वी. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू

Neem Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी प्या कडुलिंबाचा रस, चेहऱ्यावरचे काळे डाग आणि मुरूमे होतील कमी

Hair Care: केस धुतल्यावर खूप तुटतात? या टिप्स आत्ताच करा फॉलो, मजबूत केसांचं सिक्रेट

आता 'या' राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, मित्रपक्षाचे CM राजीनाम देणार, शपथविधी कधी होणार?

Influencer Death : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या; घरात घुसून चाकूने हल्ला, मनोरंजनसृष्टी हादरली

SCROLL FOR NEXT