Zohran Mamdani Saam Tv
देश विदेश

Zohran Mamdani: अमेरिकेत राजकीय उलथापालथ, भारतीय वंशाच्या नेत्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का, नेमकं प्रकरण काय?

Zohran Mamdani Makes History: अमेरिकेमध्यो मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भारतीय वंशाच्या नेत्याने डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला. जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर झालेत.

Priya More

Summary -

  • अमेरिकेत मोठी राजकीय उलथापालथ झाली

  • भारतीय वंशाच्या नेत्याने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला धक्का

  • जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर झालेत

  • जोहरान ममदानी यांनी ट्रम्प समर्थक उमेदवारांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला.

अमेरिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये एक ऐतिहासिक राजकीय बदल पाहायला मिळाला. भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर झाले आहेत. त्यांच्या विजयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला.

महत्वाचे म्हणजे जोहरान ममदानी यांचा विजय हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच ममदानी यांना विरोध केला होता. जर ममदानी महापौर निवडणुकीत विजयी झाले तर न्यूयॉर्कला निधी देणे बंद करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. या धमकीला न जुमानता ममदानी यांनी महापौर पदाची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. या निवडणुकीत ममदानी यांनी दोन्ही विरोधी उमेदवारांना मागे टाकत भरघोस मत मिळवली.

जोहरान ममदानी यांनी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर एंड्रयू क्योमो आणि रिपब्लिक पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला. तर विद्यमान महापौर एरिक अॅडम्स यांनी सप्टेंबर महिन्यात महापौर पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतली होती. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते ९ वाजेपर्यंत ही निवडणूक पार पडली.

ही मतदान प्रक्रिया २५ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती आणि रविवारी संपली होती. ही निवडणूक यासाठी महत्वाची मानली जात आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळातील पहिली मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जोहरान यांनी महापौर म्हणून न्यूयॉर्क शहरामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणेल असे सांगितले.

जोहरान ममदानी हे ३४ वर्षांचे असून त्यांचा जन्म युगांडामध्ये झाला आणि ते न्यूयॉर्क शहरामध्येच मोठे झाले. ते न्यूयॉर्क राज्य विधानसभेचे सदस्य आहेत आणि स्वत:ला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून ओळखतात. जोहरान हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते मीरा नायर आणि युगांडातील भारतीय वंशाचे लेखक महमूद ममदानी यांचा मुलगा आहे. जोहरान यांचा विजय हा अमेरिकेतील भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरंधा घाटात दुचाकीचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; सामान्य लक्षणं समजण्याची चूक करू नका

Accidnet News : सोलापुरात भीषण अपघात! २५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल, डिव्हायडर तोडला अन्...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT